दागीना

Submitted by विनायक. दि.पत्की. on 28 May, 2013 - 12:05

एक सुखद बातमी
सोन्याचे भाव कमी झाले
झाले? मग काय विचारता चला उन्हा तान्हात रांगेत उभे राहू पण सोने घेऊच घेऊ .प्रसंगी कर्ज काढू पण दागिन्याची हौस भागवून घेऊ .नाहीतर मुलांच्या लग्ना साठी तरी घेऊ त्यामुळे भविष्यातील लग्नातील खर्च तरी कमी होईल या भाबड्या आशेने,सोनारांच्या दुकानाकडे धाव घेतली जात आहे.अशा परस्थितीत, बिकट परस्थिती बदलण्याचा काही सज्जन प्रयत्न होऊ शकेल काय ? म्हणजे आजकाल सोने सांभाळणे किती जिकरीचे होऊन बसले आहे? सर्वानाच दागिने आवडतात असे नाही मग मुलांच्या लग्नासाठी दागिने घेऊन ठेवणे कितपत योग्य आहे? बरे आपल्या पुढे अनेक महत्वाच्या आर्थिक अडचणी असताना सोन्यात पैसे अडकवून त्याचा खूप फायदा होईल या भाबड्या आशेवर जगणे कितपत योग्य आहे?शेवटी काल माना नुसार आपण पैसा योग्य रीतीने वापरण्यास जर शिकलो नाही तर काळ च आपल्याला माफ करणार नाही. राहिला दागिन्याचा प्रश्न तर दागिना कशा साठी तर व्यक्तिमत्व उठून दिसण्या साठीच ना? मग मनुष्य त्याच्या अनेक चांगुल पणाच्या गुणाने जर अफाट प्रगती करू शकतो ते दागिने मिळवण्याचे मात्र प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत .हेच दागिने मनुष्यास शोभतात हे कोणी चोरू शकत नाही उलट घ्या म्हटले तर का कु करतील असे कायम स्वरूपी ठेव असलेले सोडून त्या धातूच्या दागिन्याचे महत्व आपले आपण तपासून स्वत: ची प्रगती साधावी हा हेतू. तसेच कोणत्या गोष्टीचे महत्व वाढवणे अथवा कमी करणे हे आपल्यावरच अवलंबून आहे महत्व जरूर आहे मोह मात्र घातकच आहे . या साठी माझ्या वाटेला आलेला संवाद .(अर्थात दागिने प्रेमींची क्षमा मागून)
दागीना
बायको…..
अहो ऐकले का?
सोन्याचे भाव कमी झाले.
वाटते आता सुवर्ण युग आले.
दागिने खरेदीची संधी नामी
धनी तुम्ही आता लागा कामी.
मी…..
सखे तुला ठाऊक आहे,
सोन्यातच कलीचे वास्तव्य आहे.
जर सोन्याचा भाव कमी
तर तो घराघरात सापडण्याची हमी.
बायको.....
तुमचे हे नेहमीचेच तत्वज्ञान
इथे वाया जाते माझी शान
मी……
सखे तू सौंदर्याची खाण
तुझ्यात नाही दागिन्याची वाण
बायको…..
हा तर तुमचा आहे बहाणा
मी लंकेची पार्वती हाच तुमचा बाणा
मी…..
लंकेची पार्वती तर अन्नपूर्णा
तशीच तू सुगरण हे तू ध्यानी धर ना
तू चरित्राची खाण,तुझ्यात नाही काही वाण
थांबव काटेरी बाण,तू आहेसच छान.
बायको……
दुसऱ्याचे धनी बायकोचे ऐकतात,
एक तान छेडताच तालावर नाचतात.
माझे मीठ आहे च आळणी,
दागिन्या विना माझी झाली चाळणी
मी……
सखे तुझे खास संस्काराचे मीठ
म्हणूनच उपजली पोरे नीट
पोरांचा आपल्या लोकांना हेवा
हेच तुझे दागिने हाच तुझा ठेवा
बायको…….
समारंभा पुरते तरी घ्या
(उद्या भाव वाढतील बर) आजच मला दुकानात न्या
मी…….
समारंभात दागिना काय कामाचा
जिथे मोल ना घामाचा
आवाजच तुझा आहेच भारी
समारंभात तुला तोच तारी
बायको (हसून)…….
बरे माझे जाऊ द्या
तुमच्या अंगावर दागिने मला पाहू द्या
मी…….
तू लंकेची पार्वती,मी सांब भोळा
उगाच दागिने मी का करू गोळा
सद गुणावरच माझा डोळा
बाणा हा आहे मराठ मोळा
बायको……..
अहो मी तर उद्याचे पहाते
महागाईला आपण उत्तर कसे द्यायचे?
मी……….
सदगुणांचे दागिने असतात अनमोल
सोन्याचे दागिने त्या पुढे मातीमोल
आवशक गोष्टीत पैसा खर्चावा
दागिन्यात तो व्यर्थ न दडवावा
बायको…….
उद्याचे काहि बघायला नको?
का येईल दिवस तो तसाच धको.
मी…….
ज्याला आहे भामट्याचे भय
तो सुख निद्रा देईल व्हय?
दागीन्याने पैसे वाचणार नाही
सांभाळण्याचे कष्ट थोडे नाही
बायको……..
काळजी मलाच असते सर्व
तुम्हाला नसत्या गोष्टीचाच गर्व
मी……..
दागिन्यासाठी दुकानात तिष्ठ्ने
ठीक नाही माझ्या दृष्टीने
वर दुकानदाराचे गर्वाचे वागणे
चार लोकात नको ते सांगणे
बायको…….
तुमच्या साठी आता माझे दागिने वर्ज
पण तुम्ही लग्नासाठी काढू नये कर्ज.
मी…….
सखे, सदगुणांची खाण हा दागिना मोठा
त्याला नसतोच चोरा पासून तोटा
ना काळजी,ना पैशाचा घाटा
सज्जनाना च सापडतील आपल्या घरच्या वाटा
बायको…….
आजकाल सज्जनांची तर आहे उणीव
तुम्हाला नाही का याची जाणीव?
मी……..
सगळेच आहेत निश्चित सज्जन
नको ती वासनाच बनवते दुर्जन
वासनेला हाकलायची दाबावी कळ
सर्व सज्जन येतील जवळ
बायको…..
या वर तुम्ही जर कविता लिहली
अन सोन्याची खरेदी कमी झाली
मोर्चा काढतील आपल्या घरावर
दगडाचा वर्षाव होईल दारावर
मी……
मोर्चा येईल तर येऊ दे
सोन्याची अवकळा त्यांना हि कळू दे
सज्जनते कडे सर्वाना वळू दे
जगात सुख शांती नांदू दे

Group content visibility: 
Public - accessible to all site users