दिल ढूँढता है ...

Submitted by भारती.. on 23 May, 2013 - 04:58

दिल ढूँढता है ...

त्या आळसलेल्या सुखावलेल्या दिनराती
त्या पहिल्या प्रेमाच्या उत्कंठित रुजवाती

सहवास तिचा रंगवीत तंद्रीतच बसणे
मन शोधत आहे पुनः तसे भ्रमणेरमणे

दिस उजाडला तरी अंगणात लोळत होतो
कोवळ्या हिवाळी उन्हाशीच खेळत होतो

मग उपडे पडुनी कूस बदलुनी झोपावे
छायेत तुझ्या पदराच्या डोळे निववावे

कधी उन्हाळ्यातल्या रात्रौ पूर्वेच्या झुळुका
घेऊन सवे येती शीतलशा काळोखा

पसरून छतावर शुभ्रशीत चादरी आम्ही
जागलो किती निरखीत चांदण्या गर्द तमी

आणिक कधीतरी पर्वतातल्या शिशिरात
गोठवते थंडी हिमवर्षावी प्रहरात

दरी खोरी घुमवीत ऐकू येते जणू शांती
क्षण ओले कुठुनी पापणीत दाटून येती..

भारती बिर्जे डिग्गीकर

(* 'गच्ची' ऐवजी 'छत' -श्री.अशोक पाटील यांची सूचना, 'मी' ऐवजी 'आम्ही'-अश्विनीमामींची या दोन्ही सूचना अर्थाच्या अंगाने विचारांती ग्राह्य वाटल्या म्हणून बदल केलेली ओळ, धन्यवाद दोघांचेही.)

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दिल ढूँढता है ...

दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसत के रात दिन
बैठे रहे तसव्वुर-ए-जानाँ किये हुए

जाड़ों की नर्म धूप और आँगन में लेट कर
आँखों पे खींचकर आँचल के साये को
औंधे पड़े रहें कभी करवट लिये हुए

या गरमियों की रात जो पुरवाईयाँ चलें
ठंडी सफ़ेद चादरों पे जागें देर तक
तारों को देखते रहें छत पर पड़े हुए

बर्फ़ीली सर्दियों में किसी भी पहाड़ पर
वादी में गूँजती हुई खामोशियाँ सुनें
आँखों में भीगे-भीगे लम्हें लिये हुए

(चित्रपट मौसम (1975)
संगीत मदन मोहन
गीतकार गुलज़ार
गायक : भूपिंदर सिंह, लता मंगेशकर)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर जमलाय.. त्या कल्पना प्रत्यक्षात अनुभवल्याचा जो भास त्या मूळ सूरातूनच जाणवतो तो या भावानुवादातून पण जाणवतोय.

सर्वांचे खूप खूप आभार.
कधी कधी दुसर्‍या कुणाची भावना अगदी आपली होते आणि तितक्याच सहजतेने ती आपल्या शब्दात प्रतिबिंबितही होते..कधी मूळ रचना अत्यंत आवडत असूनही असे घडत नाही. निर्मितीची कोडी.

जाई,
>>पण भारतीताई तू ओरिजिनल लिही ना >>
अगदी मर्मावर बोट ठेवलंस. जेव्हा ओरिजिनल कमी लिहिलं जातं तेव्हा मन अनुवादाचा आश्रय घेतं. माझ्याबाबतीत असंही अजून एक होतं की माझं ओरिजिनल जरा हार्ड्कोअर कवितेकडे झुकतं, म्हणून या लोकाभिमुख व लोकप्रिय रचनांची अनुकृती करून मी स्वतःतली एक कसर कदाचित भरून काढते.. पण लिहेनच, तेव्हा तू वाचशील ना ? की म्हणशील भारतीताई काहीतरी क्लिष्ट लिहिते म्हणून Happy

दिनेशदा, तुमची लिस्ट विसरले नाहीय..

मूळ गा़लिबचा शेर असा आहे:

जी ढूंढता है फिर वही फुरसत के रातदिन
बैठे रहे तसव्वुर-ए-जाना किए हुए

गुलजा़रचं रिअलायझेशन चकित करणारं आहे.
त्याच्या स्मार्ट पोएटच्या प्रतिमेस साजिरं असेच आहे..
उरले न आता चांदणे ह्या गझलेची प्रेरणा गालिबचा हा शेरच होती.

बाकी पाल्हाळ न लांबवता प्रामाणिकपणे सांगतो की शब्दशः अनुवाद मला सहसा पटत नाही.
प्रयत्न चांगला आहे मात्र कारण कृत्रिमता जाणवते.

धन्यवाद.

दाद, समीर,शाम आभार Happy

शब्द्शः अनुवाद अशासाठी की हे मराठीत पडलेलं मूळ रचनेचं प्रतिबिंब. माझ्या भाषेच्या पाण्यात हलणारी दूरच्या दिव्यांची ''आरास'' ( छान शब्द दाद.)

हा जर्म घेऊन मी निर्मिती करते तेव्हा ती अनुकृती नसते.त्यात माझा टक्का मोठा असतो. त्याच वेळी ती माझी शुद्ध निर्मितीही नसते.असे काही करण्यापेक्षा मला शुद्ध अनुवाद करायला आवडते. वै.म.

शिवाय ही गंमत करायला मला असेचही आवडते. बेफिकीर एकदा अनुवादांच्या संदर्भात म्हणाले तसं कवीची नेट प्रॅक्टिस आहे ती. खेळही , प्रातिभ फिट्नेसही.

समीर, मला वाटतं मूळ गालिबच्या शेरात 'फुर्कत' होतं, 'फुर्सत ' नाही. अर्थ खूप बदलला गुलझारजींनी.आत्ताच म्हटल्याप्रमाणे मूळ जर्म घेऊन नवीनच काहीतरी केलं, सहमत, स्मार्ट मूव्ह,सुंदरही, पण शुद्ध निर्मिती नाही.

मस्त. हे माझे खूप आवड्ते गाणे आहे. तुझी रचना पण सुरेख. आजकाल ते पुरवाई वगैरे शब्द माहीत असणारे समजणारे फिल्मी कवी आणि तश्या रचना कमीच आढळतात. बर्फी सिनेमातले एक गाने असेच खूप आवडले आहे त्याचा मी मराठीत अनुवाद केला पण तितका छान जमला नाही.

जर्म<<< जन्म का? जर्मही चालेल त्याचाही एक अर्थ लागतोय

शुद्ध निर्मिती.............हाम्म्म्म Sad

अहो भारतीताई कधी कधी मला वाटतं की आपण सगळे हुश्शार हलवाई आहोत (जे स्वतःला कल्पक म्हणवतो)
उपीटाच्या फोडणीसहीत श्रावणघेवड्याची भाजी केली की आपली नवी रेसिपी(शुद्ध निर्मिती) तयार त्यातच साध्या मिठा ऐवजी खडे मीठ घालायचं की अजून एक नवी रेसीपी असं काहीसं करतात काही लोक तर

हा वर गालिब्चा उल्लेख आलाय ; की शेर मुळात त्याचा होता
गुल्जार्जीनी काय केलय फुर्कत ला फुर्सत केलय ...तुमच्याकडूनच समजतय हे मला माहीत नसतात असल्या गमती .... आणि अजून एखादा तुरळक बदल केला असेल

आता मला सांगा शुद्ध निर्मिती म्हणजे काही असेल का या जगात

~एकतर आपण जे चिंतन आत्ता करत असतो ते जगाच्या पाठीवर कुणी दुसराही आत्ताच करत असतो यावर माझा विश्वास
~नाहीतर या अनादीअनंत कलप्रवाहात पुढे /मागेही कुणीतरी ते करणारच ...केलेच असेल हेही मला पटते
~अगदीच नाही म्हटले तर आमचे तुकोबा म्हणालेतच की बोलविता धनी वेगळाची (मलातरी सूक्ष्मशीही जाणीव झाली नाहीये अजून ते जे म्हणाले त्याची )

मग हे शुद्ध शुद्ध असतय तरी काय ???

जमेल तश्या सांगा पण सांगा भारतीताई

सहज चिंतन केलय ते मांडतोय मुद्दाम चर्चा छेडणे /वाद उकरणे वगैरे नाही आहे हे !!..गै न Happy

चू भू द्या घ्या !!!!!

~वैभव

.........प्रतीक्षेत Happy

फुरसत- आळशीपणा की निवांतपणा?

आळशीपणात काही करण्याची इच्छा नसते तर निवांतपणात मन इतकं समाधानी असतं की काही करायची गरज नसते.

अनुवाद एक स्वतंत्र कविता म्हणून छान आहे पण मूळ चित्रपटातील गाण्यात प्रत्येक कडव्यात एक तृप्त सहवास (दोघांचा एकत्रित निवांतपणा) प्रतित होतोय तर अनुवादात एकट्याने. असं मला वाटतंय.

to be very honest, असं वेगळं वेगळं काहीतरी लिहित राहणं हेच मला कौतुकास्पद वाटतं... स्वतःला सुचलं नाही, तर अनुवाद.. पण शब्दांशी नातं घट्ट ठेवण्याचे हे प्रयत्न भावतात...

अनुवाद जमलाय की नाही, ते माहित नाही, पण अनुवादामधली शब्दांची निवड खूप आवडली...

अग नक्की वाचेन
मी मागेच म्हटलय ना तुझी शब्दकळा छान आहे त्या कृष्णकवितेत
तू लिहीतर खर
इनफँक्ट तुझा अनुवादाचा प्रवास ऊलट दिशेने व्हावा अस वाटत
मराठीतल हिँदीत

रागावू नको

>>>इनफँक्ट तुझा अनुवादाचा प्रवास ऊलट दिशेने व्हावा अस वाटत
मराठीतल हिँदीत
<<<<<<<

पर्यायी वाक्य हवे!!

>>>>>>इनफँक्ट प्रवास ऊलट दिशेने व्हावा अस वाटत तुझ्या मराठी कवितांचे अनुवाद
हिँदीत !!!!!
<<<<<<<<<<

अनुवाद एक स्वतंत्र कविता म्हणून छान आहे पण मूळ चित्रपटातील गाण्यात प्रत्येक कडव्यात एक तृप्त सहवास (दोघांचा एकत्रित निवांतपणा) प्रतित होतोय तर अनुवादात एकट्याने. असं मला वाटतंय. >>>> +१ नक्की काय वाटतंय ते शब्दांत सांगता येत नव्हतं. सातीने बरोबर व्यक्त केलंय.

Happy मजा येतेय.
राग कसला दोस्तहो प्यारही प्यारच तर आहे या इंटरअ‍ॅक्शनमध्ये..
!
शुद्ध काहीच नसतं, तरीही आपल्या श्रद्धेनुसार आपण शुचिता पाळत असतो..

शुद्ध काहीच नसतं, तरीही आपल्या श्रद्धेनुसार आपण शुचिता पाळत असतो..
>> टाळ्या!!!!

प्रतिसादातही कविता, ललित वगैरे! Happy
दाद आणि तुम्ही, सारख्याच!

शुद्ध काहीच नसतं, तरीही आपल्या श्रद्धेनुसार आपण शुचिता पाळत असतो..<<<<<:अओ:

अरेच्च्या !!! तेच तर की म्हणतोय मीही !!!! Happy

(मलाही टाळ्या पय्जेत :हाहा:)

साती, केश्वी, मलाही ते वाट्त होते. म्हणजे ते उन्हाळ्यात छतावर झोपून तारे मोजायचे हे दोघांनी.
हा एक अगदी तृप्त रिलेशनशिप मधला आनंदाचा भाग असेच मला नेहमी हे गाणे ऐकले कि वाट्ते.

जे गाणे फास्ट आहे व ड्युएट आहे ते जेव्हा रिलेशन शिप एका जादुई वळणावर असते तेव्हाचे आहे.

भुपेंद्राचे जे सोलो आहे ते शेवटच्या कडव्यातले त्याला ती हरवून गेल्याचे दु:ख आहे तेव्हाचे आहे.

समीर, मला वाटतं मूळ गालिबच्या शेरात 'फुर्कत' होतं, 'फुर्सत ' नाही. अर्थ खूप बदलला गुलझारजींनी.

अशक्य.
तसं ही फुर्कत=वियोग, त्यामुळे मला काही अर्थ लागला नाही.

Pages