सुट्टी मिळ्ण्यासाठी बॉस/ शाळेत्/ कॉलेजात मारलेल्या थापा

Submitted by मउ on 23 May, 2013 - 03:15

कृपया लक्ष द्यावे हा धागा निव्वळ मनोरंजना साठी आहे Happy

चला आता कोणी मारल्यात का अशा कधी थापा Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.maayboli.com/node/43183

हा धागा अंवातर नसल्याने मी पुन्हा नवी धागा उघड्ला आहे
कृपया नवीन प्रतिसाद इथे द्यावेत
आणि त्या धाग्या वरी प्रतिसाद जमतील तसे पुन्हा द्यावे
तुम्हाला झालेल्या तसदीबद्दल क्षमस्व

सुट्टी कशी मिळवावी......................................
.
.
.
.बॉस ला सुट्टी ही नेहमी सांगावी............मागु नये...............कारण मागितलेली गोष्ट कधीच मिळत नाही....
.
.
फक्त एकच शब्दात सांगावे........ " मी या तारखेला नाही आहे इतके दिवस... माझे काम सांभाळाणारे हे हे सुट्टी वर नाही आहेत..........................."
.
.
बस झाले तुमचे काम डोळा मारा.
.
.
( मी बॉस आहे...आणि मला सुध्दा बॉस आहे ) ..खो खो

limbutimbu | 22 May, 2013 - 16:11

>>> बॉस ला सुट्टी ही नेहमी सांगावी............मागु नये...............कारण मागितलेली गोष्ट कधीच मिळत नाही.... <<<< हाहा अगदि अगदी,
मी हेच करतो, पण माझा आधीचा दहावर्षे असलेला बॉस, त्याला सान्गायला गेल्यावर दरडावुन रूक्षपणे विचारायचा की तुम्ही सुट्टीची परवानगी मागायला आला आहात की नुस्ते सान्गायला? सान्गायचे असेल तर त्याचीतरी गरज काये?
मी पण ठणकावुन सान्गायचो, की होय, सान्गायलाच आलोय की सुट्टी घेतोय (द्यायची तर द्या नै तर गेलात उडत हे मनातल्या मनात) अन अर्थात दरवर्षी माझे अ‍ॅप्रेझल कसे होत असेल याची कल्पना करु शकताच ना? डोळा मारा त्यामुळेच म्हणतो, जेव्हा थाप मारणे आवश्यक तेव्हा जरुर मारावी.
(मी बॉस नाहीये, .... अन घरीदारी माझ्या डोक्यावर अगणित बॉसेस आहेत फिदीफिदी )

रॉबीनहूड | 22 May, 2013 - 16:46

आजोबा: चिन्टू आधी घरात पळ , तुझे मास्तर तुला शोधायला इकडेच येत आहेत वाटतं...
चिंटू: आजोबा , तुम्हीच आधी घरात पळा, मी त्यांना माझे आजोबा वारलेत म्हणून शाळेत येऊ शकणार नाही असे कळवलेय ...
हसून हसून गडबडा लोळण

गमभन | 22 May, 2013 - 16:57

हा धागा वाहता झाला आहे का?
आधीचे प्रतिसाद गायब झालेत.

मउ | 22 May, 2013 - 16:58

मला हा धागा अवांतर वाचना साठी करायचा आहे तो कसा करता येइल?

संपादन

परदेसाई | 22 May, 2013 - 17:10

आमचा बॉस सुट्टीवर निघण्याच्या आदल्यादिवशी विचारतो, 'मग तुझं काम दुसर्‍या कुणाला करता येईल?'...
मी २५ वर्षात या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलेलो नाही..

अविगा | 22 May, 2013 - 17:11

माउ तु विरुंगळामध्ये टाकला आहेस म्हणुन वाहता झाला आहे.

उदयन.. | 22 May, 2013 - 17:15

'मग तुझं काम दुसर्‍या कुणाला करता येईल?'...
मी २५ वर्षात या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलेलो नाही..>>>>>>>>>>>>>> एकच उत्तर.........मी यायच्या आधी कोण करत होते ? त्यालाच द्या काही दिवस स्मित

लुनावाले ब्रम्हे | 22 May, 2013 - 18:09

तृष्णा यांच्या बॉसीणबाईंची जीभ गुलाबीच असावी असे आमचे मत आहे. मागे लूनावरून जाताना मला दिसली होती. रजा घेण्यासाठी त्या व त्यांचे सहकारी खोटे बोलतात. त्या खोटे बोलल्याची शिक्षा देवाने केली म्हणून बॉसीणबाईंना जीभ काळी म्हणणे हे लिफ्ट मागून वर ४ हजार रुपये ढापण्याइतकेच दुष्टपणाचे आहे असे शाळेत असताना पोतदार-पावस्कर मॅडम शिकवत असत.

रिया. | 22 May, 2013 - 18:13

परदेसाई, अगदी अगदी अरेरे

हा धागा वहाता नको प्लिज

गिरीकंद | 22 May, 2013 - 19:13

सुट्टीच नव्हे पण शक्यतो कामाच्या ठिकाणी कधीच खोटे बोलु नये. कारण एक खोटे लपवण्यासाठी अजुन खोटे बोलत रहावे लागते आणी खरे बोलण्याचा एक फायदा म्हणजे आपण काय बोललो होतो हे लक्षात ठेवावे लागत नाही. स्मित

राज्या | 22 May, 2013 - 19:23

एकच उत्तर.........मी यायच्या आधी कोण करत होते ? त्यालाच द्या काही दिवस >>>>>>>>
टु गुड स्मित

आम्ही ओनलाईन फॉर्म भरतो
आणि बॉस कधीच रीजेक्ट करत नाही.
गेल्या ८ वर्षात एकदाही सुट्टी नाकारली गेली नाही स्मित

आमचा बॉस देवमाणुस आहे स्मित

आशुचँप | 22 May, 2013 - 19:31

मी पण माझ्या बॉसला एकदा झापलेला...
मुलगा आजारी आहे म्हणून सांगितले तर संशय घेतलेला..
त्याला त्याच वेळी तडकावला होता...की खोटी सुट्टी मिळवण्यासाठी मुलाला आजारी पाडण्याईतकी घाणेरडी वृत्ती नाहीये माझी. तुला सुट्टी द्यायची नसेल तर मी कामाला येतो पण पुन्हा जर असा बोललास तर वरती लेखी तक्रार करीन...
तेव्हापासून बराच नमून असतो...

पिल्या | 23 May, 2013 - 08:28

मी परवानगी मागतचं नाही. मागितल्यावर त्याचं वाकडं तोंड कोण बघणार!
सकाळी SMS टाकायचा, येत नाहिये म्हणुन, दुसर्या दिवशी गेल्यावर झक्कत approve करावीचं लागते.

vaibhavayare12345 | 23 May, 2013 - 08:45

बिनकामाची मी सुट्टी घेत नाही हे बॉसला पक्कं माहित असल्याने जास्त आढेवेढे न घेता सहज सुट्टी मिळते, फक्त त्याचं एक पेटंट वाक्य आहे " तु नाहियेस तर बाकीच्यांना सगळं समजावुन जा "

झकासराव | 23 May, 2013 - 10:01

आता हा बीबी बॉस लोकं गुपचुप वाचणार आणि हाताखालच्या माणसाना सुट्टी देताना का कु करणार... डोळा मारा

limbutimbu | 23 May, 2013 - 10:17

झकोबा, काळजी नको, बॉस लोकान्ना मायबोलीवर प्रवेश बन्द आहे ! फिदीफिदी
अन ज्या बॉस लोकान्ना "मायबोलि वाचनासारखे" छन्द असतील, तर इतक्या सज्जन बॉसेस करता हा धागा नाहीच्चे! डोळा मारा

गमभन | 23 May, 2013 - 10:23

आता हा बीबी बॉस लोकं गुपचुप वाचणार आणि हाताखालच्या माणसाना सुट्टी देताना का कु करणार... >>>

बॉस को भी बॉस होता है.
करावे तसे भरावे ही म्हण ऐकली असेलच. स्मित