'प्रिया कपड्यांच्या घड्या घातल्यास का? आटोप लवकर, पानं वाढून घेतलीयत पाणी भरुन घे ... मुलखाची चेंगट आहे ही मुलगी ..सासरी गेल्यावर हीच कस काय होणारय देवच जाणे ! दुस-या दिवशी दारात नाही आणून सोडली सासरच्यांनी परत म्हणजे मिळवलं'.....इति मातोश्री.
'वासंती, जावू देत ग ! मी घेतलय बघ तांब्या-भांडं भरुन, का मागे लागतीयस तिच्या ? ...लहान आहे ती तशी अजून.'....-बाबा.
लहान ? लहान-लहान म्हणून पाठीशी घालू नका हं तुम्ही तिला, आज तुमचे लाड होतील अन उद्या तिच्या सासरची लोकं मला नावं ठेवतील, मुलीला वळण नाही लावल आईन म्हणून ....
अग काळजी करु नकोस याद्यात हा मुद्दा लिहून घेवूत की, मुलीला नांवं ठेवताना बाबांचं नाव घ्यायच, आईच नाही ! ...खुष ???
हा नि असा संवाद न घडलेला दिवस उजाडणं कठीण होत माझ्या घरात. माझ्या कित्येक मैत्रिणींना नेहमी त्यांच्या बाबांची भीती वाटत असे मी मात्र सदैव आपली आईच्या धाकात !...मीच नाही तर अवघ घर-दार तिच्या तालावर नाचत असे. तिच प्रत्येक गोष्टीत अगदी बारीक लक्ष ! सकाळी ७ ते ९ तिचा स्वैपाकघरातील सक्रीय वावर आख्ख घर दणाणून सोडायचा.... सकाळी सात ते सव्वासात एकीकडे बाबांचं पेपर वाचता-वाचता रेडीओवरच्या मराठी प्रादेशिक बातम्या ऐकणं सुरु असायच आणि दुसरीकडे मला झोपेतून ऊठवणं ...' पिकुड्या रे, नंदूड्या रे, छोनंद्या रे, ऊठा-ऊठा रे, चहा झाला बघ आईचा' आणि माझ आपल..'बाबा थांबा न पाच मिनीट' च पालुपद आख्खं १५ मिनींटं सुरू असायच शेवटचा जालिम उपाय म्हणजे 'पिकु आई येतीय ह आता !' हा असे नि मी टुणकन पांघरुण झटकून ऊठून बसे !
तिच कुकर लावण सुरू असे तेव्हा नि मला सडा-रांगोळीची आठवण करुन देणं सुध्दा ! केर- वारे, तांब्या-भांडी-कपबश्या घासून-विसळून घेणे ही शिस्त तर होतीच होती त्या शिवाय आंघोळ आटोपून अभ्यासालाही वेळेत बसावे लागे....बाथरुम मधली २-३ जास्तीची लागलेली मिनीटंही तिच्या चाणाक्ष नजरेतून सुटत नसत...आटोप पट-पट तासन तास बाथरुमधे बसू नये मुलीच्या जातीन .....वैगरे-वैगरे... 'मुलीची जात' हे माझ्या बाल मनाला तेव्हा पडलेल कोड आजतागायत सुटता सुटल नाहीय ही गोष्ट निराळी.... असो !
माझ्यावरच नाही तर तिची माझ्या लहान भावावरही तेवढीच करडी नजर असे, तो अभ्यासाला बसलाय की नाही? कुठला विषय करतोय ? शब्दांच्या स्पेलिंगसोबत त्याचे अर्थही पाठ करतोय की नाही ? पाढे पाठ करताना पुस्तक एकीकडे अन लक्ष दुसरीकडे असं तर नाही होत आहे न हे तपासायला तिच्या स्वयंपाकघर ते हॉल अशा अनेक चकरा होत तेवढ्यातल्या तेवढ्यात.
डॉट साडेनवाला आम्ही सगळे जेवणाच्या टेबलवर हजर असूत, तिच्या हाताची चव तर एकदम वाखाणण्याजोगी असायची प्रत्येक पदार्थ ताव मारावा असा... आणि कामाची गती तर अशी की षोडशेलाही लाजवेल....ज्या दिवशी चुकून माकून तिच्या एखादया पदार्थात तिखट-मिठ कमी-जास्त झालच तर बाबा म्हणत असत की 'वासंती आज तू हा पदार्थ सवडीने केलेला दिसतोयस !' गुरवार- शनिवार बाबांचे उपास...मी गुरवारची म्हणून अन भाई शनिवारचा म्हणून आमच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत खंड न पडता केलेले...तर या दिवशी आईचा एक गोड पदार्थ ठरलेला कधी साखरआंबा कधी शिरा कधी उरलेल्या दह्याच पांढ-या शुभ्र फडक्यात गुंडाळलेल्या आंबट-गोड चक्क्याच श्रीखंड, शेवयाची खिर, तर कधी शिकरण सुध्दा...आई भाज्या कधी निवडायची, दळणं कधी करायची, हे कधी कळूनच यायच नाही...सार काही सकाळी ७ ते ९ च्या आत-बाहेरच.
१० वाजता तयार होवून १० ते ११ ती 'पडायची' (गादीवर हो! ) नी १२ ते ६ तिची शाळा... मराठी-इंग्रजी-इतिहास- भूगोल हे तिचे विषय... पी.टी अन गणिताशी तिचा छत्तीसचा आकडा...शिस्तप्रिय कडक शिक्षिका म्हणून तिचा शाळाभर दरारा... रजा घेणे तर अगदीच विरळा...रहाणीमान टाप-टीप, दागिन्यांची नाही पण साड्यांची
निरातिशय आवड...तिचा वर्षोनवर्षे ठरलेला शिंपीही शाळेत जायच्या रस्त्यावरचाच !
घराच्या बागेतील प्रत्येक रोपटी तिच्या निवडीची....कुणालातरी पकडून आणून ती बागेतील बागकाम करवून घ्यायची निशीगंधाचे कांदे, जास्वदीं, गुलाब, जाई-जुईच्या काड्या खोवून घेणे, बाग स्वच्छ करवून घेणे, डीडोनियाची कटींग करवून घेणे, पेरु, लिंबू, कन्हेर, नारळ या झाडांना खत घालून घेणे हा तिचा रविवारचा उद्योग ...हं पाणी मात्र बाबाच घालत दररोज या झाडांना अर्थात तिच्या सुचनेबरहुकूमच !
झाडातील माती बदलणे, हौद धूवून घेणे, वरचे माळे आवरुन घेणे हे तिचे दिवाळी- उन्हाळा अन संक्रांतीच्या सुट्टीतले आवडते छंद ! ती जर शिक्षिका झाली नसती तर खरोखर एक उत्कृष्ट व्यवस्थापक होवू शकली असती हे एकदा नाही तर शंभरवेळा माझ्या मनात येवून जात आजकाल ! तिची कामे करवून घेण्याची हातोटी आणि सुचना करण्यातील जरब वाखाणण्याजोगी आहे. आजही मोलकरीण हा तिच्या जिव्हाळ्याचा विषय !
संध्याकाळी दमून-भागून आलेली आई मात्र अगदीच वेगळी वेगळी वाटायची मला तिच्या सकाळच्या रुपाच्या तुलनेत... शांत, सगळ्यांच सगळ ऐकून घेणारी...भविष्याचे बेत आखणारी हास्य-विनोदात सामिल होणारी तरीही 'सातच्या आत घरात' हा तिने घालून दिलेला दंडक आम्ही पाळतोय की नाही यावर करडी नजर ठेवून असणारी !
वयाच्या १८ ते ५८ वर्षांपर्यंत नोकरी करणा-या आईच वेळापत्रक पूर्णतः बदललय सध्या, ती आता टी.व्ही च्या मालिकांमधे जास्त रमते आजकाल...बाबांच्या माघारी तिच संसारातल लक्षही बरच कमी झालय आताशा... तिच हे शांत-निरागस रुप पाहून ब-याचदा मलाच भड-भडून येत
शेवटी एवढच म्हणावस वाटत...
जिवापाड आईस सांभाळताना
तिची मायही लागते मीच आता !!!
-सुप्रिया.
वयाच्या १८ ते ५८ वर्षांपर्यंत
वयाच्या १८ ते ५८ वर्षांपर्यंत नोकरी करणा-या आईच वेळापत्रक पूर्णतः बदललय सध्या, ती आता टी.व्ही च्या मालिकांमधे जास्त रमते आजकाल...
>>>>>>>>>>>>>>
आमच्याकडेही हेच चित्र आहे.. एकेकाळची उत्साहमुर्ती आई.. सध्या तिला आराम मोडमध्ये बघताना बरेही वाटते तर कधी कसलीशी चुटपुटही मनाला लागते..
लेखाबद्दल धन्यवाद !
खूप छान लेख. लेखाचा शेवटही
खूप छान लेख. लेखाचा शेवटही सुंदर.
हं ! आई प्रकार असा असतो होय
हं ! आई प्रकार असा असतो होय !
अभिनंदन.
मला आई वगैरे असती तर अशी असावी असं वाटुन गेलं. असो.
शिल्पा , काय ग बोलू यावर ?
शिल्पा ,
काय ग बोलू यावर ?
नमस्कार सुप्रिया, लहान-लहान
नमस्कार सुप्रिया,
लहान-लहान म्हणून पाठीशी घालू नका हं तुम्ही तिला, आज तुमचे लाड होतील अन उद्या तिच्या सासरची लोकं मला नावं ठेवतील, मुलीला वळण नाही लावल आईन म्हणून ....> > > >
मला नावं ठेवु नये म्हणुन वळण लागलं पाहीजे, कि मुलीला पुढे कोणी काही त्रास देऊ नये वा तीला वळण न लागण्याचा त्रास होऊ नये म्हणुन वळण लागलं पाहीजे ?
असो.
स्वर्ग जर बाबा-आई पाशी, तर का फिरु काबा काशी ? असं नसतं का चाललं ? नाही, म्हणजे ते बाबाच होते जे पाठीशी घालायचे मायेने, वात्सल्याने , त्यांचेच नावं शिर्षकात विसरल्यासारखे दिसले म्हणुन विचारलं . . . .
राग मानु नये कृपया . . . . लिहिलंस तर छानच आहे खूप, अगदि तुमच्या घरात बसुन हे सगळे अनुभवतो आहे असेच वाटले.
आणी मलाही आई-बाबांच्या आठवणीने दाटुन आले . . . .
मंदिरातुन देव निघुन गेले, आता दर्शन कसचे ?
परब्रम्ह नमस्कार, <<<मला नावं
परब्रम्ह नमस्कार,
<<<मला नावं ठेवु नये म्हणुन वळण लागलं पाहीजे, कि मुलीला पुढे कोणी काही त्रास देऊ नये वा तीला वळण न लागण्याचा त्रास होऊ नये म्हणुन वळण लागलं पाहीजे ?
असो.>>>>
वळण लावायला का ती मेंदी आहे ? ते आपोआप लागत जात ! मुख्यत्वे मोठ्या लोकांच्या वागण्याचे परिक्षण करुन (वै.म.) वरील संवाद तर थट्टा-मस्करीचा भाग होता आई -बाबांमधला
असोच !
ह्म्न !
१... हा शेर आहे त्यात मात्रा महत्वाच्या असतात.
२...बाबा ह्यात नाहीयेत माझे, त्यांची प्राणप्रिय ठेव...माझी आईच माझ सर्वस्व बनून राहीली आहे सध्या
( रच्याकने बाबांबद्दल लिहीण्यासाठी शब्दांची जुळवाजूळव करण्याकरता माझ आयुष्यही कमी पडेल )
तुम्हाला ललित वाचून आपले आई-बाबा आठवले हे वाचून खरोखर धन्य वाटले.
धन्यवाद !
-सुप्रिया.
छान लिहिलेय सुप्रिया, आईचं
छान लिहिलेय सुप्रिया, आईचं व्यक्तिमत्व डोळ्यांसमोर येतंय..
धन्यवाद . . . __/\__
धन्यवाद . . . __/\__
Va chan lihile aahes. Majhi
Va chan lihile aahes. Majhi aai pan retired teacher aahe.ti aata vadit jhade bhaji palyat ramate.
छान लिहिलंय
छान लिहिलंय
जागू, भारती, सुजा आणि
जागू, भारती, सुजा आणि प्रत्येक प्रतिसादकर्त्याचे आभार !
पुन्हा आज वर आणतेय !
पुन्हा आज वर आणतेय !
खूप छान लिहिलंय!
खूप छान लिहिलंय!
खुप सुरेख!! कधी कधी वाटते कि
खुप सुरेख!!
कधी कधी वाटते कि खरच माय बाप असणे आणि माय-बापपण जगणे यात किती फरक असतो ना.
सुप्रिया तुम्हाला खूप शुभेच्छा !!
मनाला भावलं. खुपच सुंदर
मनाला भावलं. खुपच सुंदर
Pages