विचारा..

Submitted by रसप on 19 May, 2013 - 04:45

तुझी साथ वाटे मला शाश्वताची तुझ्यावर मला हक्कही वाटतो
तसे ह्या जगाशी जुळवले कितीही तरी रोज हटकून मी भांडतो

क्वचित एकदा तू असा मूर्त होऊन येतोस, होतोस अक्षरफुले
तुझा हाच दुर्दम्य विश्वास माझ्यात आशा उद्याची बनुन किलबिले

छुप्या पावलांनी कधी भ्याड हल्ले, कधी वार होतील पाठीवरी
लढू सोबतीने जगाशी, तुझ्या सत्यतेची असे ही लढाई खरी

विचारा, तुझ्यावर अजुन ठाम मी तू नको धीर सोडूस इतक्यात रे
प्रवासास आरंभ केला कधीचा नको थांबणे व्यर्थ अर्ध्यात रे

....रसप....
१९ मे २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/05/blog-post_19.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कविता.
"छुप्या पावलांनी कधी भ्याड हल्ले, कधी वार होतील पाठीवरी
लढू सोबतीने जगाशी, तुझ्या सत्यतेची असे ही लढाई खरी " >>> ही द्वीपदी सर्वात विशेष.

------------------------------------------------------------------------------------------------------------
दोन लघु = एक गुरु ही तडजोड काही ठिकाणी रसभंगाला वाव देते असे वाटले. वैम. कृगैन.