Submitted by मंदार शिंदे on 17 May, 2013 - 05:50
काय चूक नि काय बरोबर, हिशेब सोडला मागे
नाती-गोती भाव-भावना, अवघा व्याप सोडला मागे
माझे-माझे मला-मला, ही हावच संपत नव्हती
माझ्यासाठी काय हवे, मग हा विचार सोडला मागे
हरवू नये नि सुटू नये, याचीच कायम भीती
पंगू मनाला करणारा हरेक आधार सोडला मागे
भावनावश निर्णय घेऊन, पाळल्या जगाच्या रीती
फसविणार्या भावनांचा आता व्यवहार सोडला मागे
परमेश्वरावर श्रद्धा आणि भक्ती अपार होती
आकाराचा पण हट्ट धरणारा निराकार सोडला मागे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहे.
मस्त आहे.
हरवू नये नि सुटू नये, याचीच
हरवू नये नि सुटू नये, याचीच कायम भीती
पंगू मनाला करणारा हरेक आधार सोडला मागे
व्वा.
धन्यवाद!
धन्यवाद!