जरा जरासं.... जगायचं ठरवलंय!

Submitted by बागेश्री on 14 May, 2013 - 10:21

आता ना मी,
बदलायचं ठरवलंय...
जरा जरासं जगायचं ठरवलंय!

दाखवू किती अस्तित्त्व,
जगाला अन् मलाही?
प्रवाहातल्या दगडासारखी
स्थितप्रज्ञ अवस्था..!
घट्ट रोवलेली,
खळाळ लाटा, अंगावर घेणारी....
साचलं शेवाळ मुकाट जगवणारी

ह्या अवस्थेलाच ओलांडायचं ठरवलंय,
जरा जरासं.... जगायचं ठरवलंय!

आता प्रवाहावर सोडलेलं,
पान व्हावं म्हणतेय,
उगाच जपलेलं अढळपण,
सोडावं म्हणतेय..

नको तमा,
दिशेची.. उन्हाची
वार्‍याची.....पावसाची
आड येणार्‍या इतर दगडांची अन्
खुद्द प्रवाहाचीही...!!

जमेल तसं वहावं म्हणतेय...

कधी गिरकी,
कधी हळूच डुबकी,
कधी चार जागी फाटलेपणही चालेल..
पण;

पण... वहायचं ठरवलंय...

जरा जरासं.... जगायचं ठरवलंय!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बागुडे.. धन्य आहेस!!! __/\__
पण... वहायचं ठरवलंय...

जरा जरासं.... जगायचं ठरवलंय
अप्रतिम!!!!!!!!!!! खूऊऊऊऊप आवडली... वेरी इन्स्पायरिंग!!!

Avadli Happy

कधी गिरकी,
कधी हळूच डुबकी,
कधी चार जागी फाटलेपणही चालेल..
पण;

पण... वहायचं ठरवलंय...>>>>>>>>>>>> क्या बात Happy मस्त ...खुपच आवडली Happy

Happy छान

फार सुंदर.

अगदी मी तर असे जीवन प्रत्यक्ष जगायचा प्रयत्नच करीत आलोय आजवर. बर्‍याच अंशी सफल झालो देखील. Happy

व्वा ! आशयाची छान मांडणी.
"आता प्रवाहावर सोडलेलं,
पान व्हावं म्हणतेय,
उगाच जपलेलं अढळपण,
सोडावं म्हणतेय.." >>>> या ओळी विशेष वाटल्या.