डोळ्यांमधलं पाणी

Submitted by चेतन... on 12 May, 2013 - 16:01

रिकामं हृदय जेव्हा
अचानक भरून येत
त्यावेळी डोळ्यांमध्ये
पाणी दाटून येत

डोळ्यातल्या थेंबांना
ओघळायचं असतं
पण थेंबांना कधीही
ओघळता येत नसतं

डोळ्यातले थेंब
डोळ्यातच राहतात
ओघळण्याऐवजी
तरळतच राहतात

डोळ्यातल्या डोहाची
एक खोल खंत
डोळ्यातल्या झऱ्याला
नसतो कधी अंत

करायची फक्त
एक गोष्ट साधी
लपवायचं पाणी
पापणी लवण्याआधी

काहीतरी होत पण
पाणी गळत नाही
आता तर डोळ्यामध्ये
पाणी दिसत नाही

प्रश्न पडतो मात्र
उत्तर कुठे मिळत ?
डोळ्यांमधलं पाणी
नक्की कुठे जात ?

-चेतन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.