जीवन....

Submitted by Sangeeta Kulkarni on 11 May, 2013 - 06:01

जीवन....

जीवन आहे माझे गुंतागुंतीचे
गर्द अरण्यातील दाट जाळीसारखे
नितळ भासणा-या जलाशयातील
वेलींच्या गर्दीसारखे.....

उसळली आहे मनात
गर्दी मिश्र भावनांची
दुथडी भरून वाहत आहे आज
नदीच्या प्रवाहासारखी.....

चौखूर उधळत आहेत
माझ्या भावना
असहाय्य निर्बल बनते आहे मी
आवरताना त्यांना.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

होतं असं कधी कधी... पण काय वाट्टेल ते झालं तरी असहाय्य निर्बल बनु नका.. हवंतर लहान मुलासारखं एकदा रडुन घ्यावं. परत नव्याने उभं रहावं. आपलं रडं थांबवुन दुसर्‍याच क्षणी निरागसपणे हसणार्‍या बाळासारखं Happy