आधारस्तंभ

Submitted by सुप्रिया जाधव. on 10 May, 2013 - 01:14

तिन खांबी तंबूतील आधारस्तंभ
ध्यानी-मनी नसताना अचानक भूईसपाट होतो तेव्हा

उरतात आधाराविण कोलमडलेले
दोन दीनवाणे बांबू
जमिनदोस्त झालेले छप्पर
अस्ताव्यस्त पसारा !

तिन खांबी तंबूतील आधारस्तंभ
ध्यानी-मनी नसताना अचानक भूईसपाट होतो तेव्हा

उरतात गतकाळातील वैभवाचे
भग्न अवशेष !
तोडक्या-मोडक्या चिजवस्तू
गाडली गेलेली मने !

तिन खांबी तंबूतील आधारस्तंभ
ध्यानी-मनी नसताना अचानक भूईसपाट झाला तरीही

उरलीय पायाखालची भरभक्कम जमिन,
खुणावणारं उत्तुंग आकाश
हृदयात अविरत झिरपणारी शाई
अन नव्या द्रुष्टीकोनाची नवी लेन्स !!!

तिन खांबी तंबूतील आधारस्तंभ
ध्यानी-मनी नसताना अचानक भूईसपाट झाला तरीही !

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कवितेतील भावना पोचल्या. पण पहिले आणि शेवटचे कडवे (कडवे असे नांव देता येणार नाही बहुधा, बंध म्हणावे लागेल) ( तसेही तुम्म्ही ललित लेखन या सदरात हे प्रकाशित केले आहेत) एवढेच असते तरी कदाचित पूर्णत्व जाणवले असते. यात आपल्याला दुखावायचा हेतू नक्कीच नाही.

रांग स्मशानाला आहे पण चिंता नाही
मागुन मिळतो धक्का, नेतो ओढत पुढचा

पहिल्या ओळीतच समजले की पुढे मनाचे काय होणारय ......मन सावरूनच बसलो होतो

लेखन आवडले

अवांतर :
१) ही जमीन गझलेचीच !! होय ना ? Happy

२) पहिल्यांदा जबर्दस्त प्रस्तावना म्हणून येणर्‍या दोन ओळी पुढे प्रत्येक २ 'बंधां'च्या मध्ये थोड्याच बदलानिशी व जवळजवळ तितक्याच लांबीने न देता केवळ "जेंव्हा ...... " व "तरीही ....." असे इतकेच केले असतेत तर भावना जास्त काँसंट्रेटेड ( दाट ) झाल्या असत्या
असे वाटले

.....सूचना /आग्रह /सुचवणी/ विनवणी ....वगैरे काही नाही गै न Happy

~वैवकु