सध्याचे आर्थिक वादळ

Submitted by AmitRahalkar on 30 October, 2008 - 22:08

सध्याच्या आर्थिक जगातील उठणार्या वादळाशी वाचक अवगत आहेतच. कदाचित काही वाचकांना या आर्थिक झंझावाताची झळही पोहोचली असेल.ज्या वेगाने या वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेवर आघात झाला आहे तो अचंबित करणारा आहे. या वादळाचे मूळ काय आणि आजुन किती नासधुस भविष्यात आहे असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

एका द्रुष्टीने पाहता हा जो Housing bubble फुटला आहे, त्याचे मूळ या आधीच्या Technology bubble मधे दिसेल. १९९३ साली Netscape Navigator हा Web Browser release झाला आणि internet चा वापर सामान्य माणसापर्यंत पोहोचला. Sillicon Valley मधे दर आठवड्याला एक company जन्म घेऊ लागली आणि पाहता पाहता Stock Market ही वर जाऊ लागले. १९९८ च्या Asian Tigers च्या crisis नंतर व पुन्हा Y2K साठी सुसज्जता म्हणुन Fed Governer Alan Greensapan ने केलेले बदल Stock Market ला फारच भावले. जानेवारी २००० मधे Stock Market ११७०० चे शिखर गाठले. जसे जसे लोकांना उमगले की internet companies नफ्यात नसुन तोट्यात आहेत तसे Stock Market घसरत गेले आणि सप्टेंबर ११ २००१ नंतर Stock Market ८२०० पर्यंत घसरले.Technology bubble फुटले व त्याबरोबर Global Crossing & Corning सारख्या companies ने bankruptcy घोषित केली. या दोन companies Fiber Optic cable च्या उत्पादसनात आघडीवर होत्या. २००० सालच्य सुमारास त्यांनी Atlantic महासागराच्या तळाशी Fiber Optic चे जाळे विणुन अमेरिकेला युरोप व आशिया खंडाशी जोडले होते. गंमत अशी झाली की Telecommunication च्या या pipelines २००२ च्या मंदाईच्या काळात स्वस्त झाले. परिणाम? Phone communication व internet आदी स्वस्त झाले. याची Manufacturing आणि IT outsourcing वाढायला फार मदत झाली. उगवत्या राष्ट्रांमधे सधन व्यक्तिंची संख्या वाढू लागली.

त्याच सुमारस आणि दोन घटना घडल्या. पहिली, Fed Governer Allan Greenspan यांनी Interest rate कमी करण्यास सुरवात केली. दुसरी, Fannie and Freddie Mac यांच्यावर Accounting scandal चे investigation सुरु झाले. परिणामी त्यांचा Home mortgage market मधला ४०% च्या वाटा ३०% पर्यंत घसरला. मंदाईच्या काळात Consumer spending आणि business activity कमी होते. लोक investment चे नवीन मार्ग शोधु लागले व Real estate मधे गुंतवु लागले.

Technology bubble फुटल्या नंतर investment banks नवीन धंद्यासाठी भुकेल्या होत्या. नवीन कर्जदारांचे कर्ज MBs, CDOs सारख्या products चा जन्म होऊ लागला. Fannie and Freddie ची Home mortgage market मधली गुंतवणुक कमी झाल्याने Hedge Funds जागा घेऊ लागले. एक नवीन श्रुंखला जन्म घेऊ लागली. झाले असे की-
लोकांना कर्ज देणार्या Mortgage originators (contrywide) ते कर्ज investment banks न विकू लागल्या.
investment banks ते कर्ज hedge funds ला विकू लागल्या.
hedge funds ते कर्ज institutional investors व इतर banks ना विकू लागल्या.
जणु एक घंटा खुर्ची चा खेळ सुरु झाला. Mortgage originators ना जसे कळू लागले की या श्रुंखलेच्या दुसर्या टोकाला demand आहे तसे ते lending standards ची पातळी कमी करु लागले व कर्ज सर्रास वाटू लागले (Subprime mortgage). या व श्रुंखलेतला प्रत्येक घटक फक्त आपापल्या Commission बद्दल विचार करु लागला. Investment banks अधिकाधिक कर्ज वाटू लागल्या व त्या कर्जाला securitize करुन व CDS च्या द्वारे insure करुन hedge funds ला विकू लागल्या. हळूहळू या श्रुंखलेतले घटक वाढू लागले. काही वर्षातच Commerial Banks, European banks (For example, Icelandic, German, Spanish, British, French banks) Soveriegn funds (Funds owned by Governments like that of Russia, Singapore, South Korea, Taiwan and Middle east) अश्या अनेक खेळाडूंचा समावेश झाला. Stock Market वर वर जाऊ लागले व मागील वर्षीच्या October च्या सुमारास US Stock Market १४००० ला पोहोचले.
खरे तर Regulating Agency ने या अखंड श्रुंखलेला ओळखुन Investment Banks ने दिलेल्या कर्जावर पाबंदी आणणे जरुरी होते. परंतु Securitization मुळे व CDS insurance मुळे या banks च्या पुस्तकांवर पहाता फारच थोदे कर्ज होते व त्यमुळे Regulators चे हात बांधल्या गेले. अश्यावेळी Regulations चे नियम बदलणे जरुरी होते. पण Fed Governer Greenspan व Republican सरकार हे मुळात pro-market तत्वाचे होते त्यामुळे नियम बदलले गेले नाहीत व हे Asset Bubble अधिकाधिक वाढू लागले.

नैसर्गिक नियम या Bubble लाही लागू पडला.श्रुंखलेतल्या एका घटकाने - Bear Sterns च्या दोन hedge funds ने कुवतीपेक्शा जास्ती कर्ज देऊ केले व मागील वर्षीच्या जुलै च्या सुमारास ते बंद पडले. पत्त्यांचा हा मनोरा पडू लागला. Bear Sterns या वर्षी मार्च मधे,Lehman ने सप्टेंबर मधे दिवाळे घोषित केले. Countrywide (Mortgage Lender)ला व Meryll Lynch या Investment Bank ला Bank of America ने विकत घेतले. सर्व जग भर Banking system ल धक्का पोहोचला. वाचक या घटनांशी अवगत आहेतच.

माझ्या मते हे वादळ अजुन एक वर्ष तरी चालु राहिल. श्रुंखले खुप घटक होते व एकंदरीत फार गुंत झाला होता. लूकांचा (investors चा ) विश्वास वाढवण्यासाठी American Congress व British Government ने banks मधे preferred stocks घेउन त्यांना एका तर्हेने कर्ज देऊ केले आहे. मागील आठवड्यात हा credit crunch थोडासा कमी झाल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. तरीही अजुन नियमांमधे अमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे. अमेरिकेत वाहणार्या निवडणुकींच्या वार्यामुळे असे बदल करणे फार कठीण होउन बसले आहे. काही कालावधी तरी अशी अनिश्चितता markets ला volatile ठेवणार असे दिसते.

भारतात या दशकातील प्रगती मुख्यतः IT sector मुळे झाली. IT sector मुख्यतः american clients व Banking sector वर अवलंबुन आहे. त्यमुळे त्यांना या झंझावाताची झळ निश्चितच पोहोचेल. Inflation (महगाई)व real estate चे दरही कमी होतील.

भविष्यात यहुन जास्ती नासधुस न व्हावी अशी आपण आशा करुया.

गुलमोहर: 

सुन्दर विश्लेषण !!! हे एवढे खोलातील उलाढाली माहित नव्हत्या.
धन्यवाद ! असेच मार्ग्दर्शन चलु द्या !

सुंदर लेख! अजून लिहा डीटेल्स मधे!

सुन्दर लेख अतिशय माहितीपुर्ण..

माझे काही विचार..
१. हे संकट यायला जितके फेडरल रिसर्व आणि वित्तीय संस्था जबाबदार आहेत तितकेच ग्राहकही जबाबदार आहेत. अंथरुण पाहुन पाय पसरावे हे ज्याना कळले नाही आणि ज्यानी कर्जे घेतली आणि नंतर झेपत नाही मग फोरक्लोजर मधे गेले त्यानी हे संकट आणखी बिकट होत गेले. असो. जे झाले ते होउन गेले आता तरी सावध व्हायला हवे.(अमेरिकेतील देसी लोकाना शाबासकी द्यायला हवी कारण देसि लोकानी आपल्या मर्यादेप्रमाणात घरे घेतलेली दिसतात त्यामुळे याची झळ त्याना फारशी लागणार नाही)

२. स्टॉक मार्केट गुंतवणुक (भारतातील)- यासाठी वेगळे टेंपरामेंट लागते. जर तुम्ही दैनिक चढउताराने घाबरेघुबरे होत असाल तर यापासुन दुर राहणे बरे. १०% फिक्स्ड डिपॉसिट मधील गुंतवणुक योग्य आहे. उगाच इतर काहीना म्युचुअल फंडामधे प्रचंड फायदा झाला म्हणुन आपल्यालाही होइल या अंधविश्वासाने गुंतवणुक न करणे बरे. माझी आइ म्हणायची "दुसर्याने सरी घातली म्हणुन आपण गळ्यात दोरी घालणे बरे नाही".(काही जणांच्या आत्महत्येच्या बातम्या ऐकुन खुप वाईट वाटते. आपल्या पोरांच्या शिक्षणाचा, कुटुंबाचा खर्च पणाला लावण्यात काही अर्थ नाहि.)

३. अगदी नकारात्मक विचार करणेही बरे नाही. प्रत्येक रात्रीनंतर पहाट येते त्याप्रमाणे आधीची सुज निघुन गेल्यावर चांगले दिवसही येतील पण सध्याचे मळभ दूर होणे आवश्यक आहे. त्यामुळे सावध राहणे..आहे त्या नोकरीला चिकटुन राहुन जितकी बचत करता येइल तेवढी करावी म्हणजे पुढच्या बूम साठी तयार राहता येइल.

धन्यवाद.

ह्या सर्वांमधे ही गोष्ट नेहमीच विसरली जाते

1. Bill Clinton who, under pressure from Wall Street, signed the repealing of the Glass-Steagall Act that had been instituted during the Great Depression to prevent commercial lenders from making certain risky investments. With its repeal, banks were now free to trade in instruments like MBSs, thus increasing both their risks as also their profits.

2. In 2004, under pressure from the Wall Street, SEC allowed 5 investment banks to carry leverages of 30 and even 40 to 1. This opened the doors to the potential of mind-boggling returns and also unleashed the possibility of risks for five of the pillars of the US economy., namely - Lehman Brothers, Bears and Sterns, Merril Lynch, Goldman Sachs and Morgan Stanley.
I guess list says it all. Happy

अमित तुमच्या टिकेने, तुमचा लेख कसा असेल ह्याचे ऍण्टीसिपेशन वाढले होते, पण थोडी निराशाच झाली. कारण लेख हा हे का झाले ह्या पेक्षा, झालेल्या घटनांचा थोडक्यात आढावा असाच जास्त आहे. त्यामागची कारन मिमांसा लेखात नाही. (फक्त इथे लेमॅन ची निराशा आणि ऐका मॅचुअर्ड ईन्वेस्टरची निराशा असा भाग नक्कीच आहे कारण लेमॅन टर्मस मध्ये तुमचाही लेख चांगलाच आहे.)

वर तुम्ही दोन ईकॉनॉमीक सायकल ऐकत्र आणल्या आहेत. साधारन नियम असाकी दर ६ ते ७ वर्षात कुठलिही ईकॉनॉमी ऐक सायकल पुर्ण करते. टेक बबल मुळे जे सायकल तयार झाले ते २००० ते २००१ च्या दरम्यान संपले व ९/११ नंतर परत ऐक सायकल चालु झाले ते आता संपले.
नविन सायकल सुरु करताना वेगळ्या गोष्टींवर भर द्यावा लागतोच. आताही सायकल सुरु होताना देखील अश्याच काही वेगळ्या घटना घडतील ( वर तुम्ही जे व्याजदर कमी करन्याचे व हाउसिंग मध्ये पैसे घातल्याचे उदा दिले तसे) व चार वर्षानंतर असे वाटेल की ह्या स्टेप्स घ्यायला नको होत्या. ( अगदी ह्याच कारणामुळे मी कंसात हाउसिंग बबल तयार केले असे लिहीले) पुढे काहीतरी वेगळे बबल येनार. कारण असे बबल आले नाही तर मनी रोटेशन होत नाही हा अर्थव्यवस्थेचा बेसीक नियम. कधी हे बबल अनेक वर्षे टिकून राहते तर कधी फटकन संपते.

Inflation (महगाई)व real estate चे दरही कमी होतील >> हे तितके पटले नाही. कारण दर आपोआप कमी होत नाहीत. भारतात हाउसिंग बबल नसताना देखील इन्फेशन ६.५ ते ८.५ टक्के असायचे, गेल्या काही वर्षात ते बरेचदा ९ टक्यांवर होते व आता गेल्या वर्षी पासुन फक्त १० ते ११ वर गेले आहे. त्याला परत १० च्या खाली आणन्याचे प्रयत्न चालु आहेत.

रिऐल इस्टेटचे दर कमी होन्यापेक्षा स्थिर होतील असे वाटते.

मनोज आई बरोबर सांगते. जर वापस करायची हिंमत नसेल तर तर कर्ज कशाला घ्यायचे ही भारतीय मनोवृत्ती, तर अमेरिकन मनोवृत्ती ह्या विरुध्द, आज मिळतेय ना मग घ्या हात घुवुन उद्या कोणी पाहीलाय. लोकांनी १९२९ सोबत तुलना केली कारण १९२६-२९ असाच काळ होता जेव्हा रोज कधी न संपनार्‍या पार्ट्या चालायचा, गरज नसताना लोक गाड्या घ्यायचे, वैगरे आणि तसेच आताही होत होते, फक्त गाड्याच्या ऐवजी लोक घर घेत होती Happy

In 2004, under pressure from the Wall Street, SEC allowed 5 investment banks to carry leverages of 30 and even 40 to 1 >>> ह्या घटनेमुळेच मी त्या लेखात लिहीले होते की रुल्स शिथील केले. पण ते करने जरुरी होते असे वाटते.

सहज जाता जाता
येत्या तिन चारवर्षात होनार्‍या (सध्या चालु असनार्‍या) इन्फ्रा ग्रोथ नंतर भारतात कदाचित परत ऐकदा ऍग्री बुम येउ शकते. गेल्या दोन वर्षाचा आढावा घेतला तर शिक्षीत लोक शेत जमिन खरेदी करत आहेत, ही कदाचित ऐका नविन सायकलची सुरुवात असेल. ( मी माझे मत नोंदवतोय, खात्रीलायक सांगत नाही Happy आणि खरच तसे झाले तर मी म्हणायला मोकळा की मी आधी लिहीले होते, तुम्ही ऐकले नाही म्हणून. Proud )

रहाळकर, लेख आवडला.. छान मांडलय..
आता ह्यातून पुढे काय याबाबत तुमचे अंदाज, आडाखे ऐकायला आवडतील.. हवं तर तुम्ही आणि केदारने मिळून एक कार्यशाळा घ्यायला हरकत नाही Wink

रहाळ्कराचा लेख आवडला.त्यावर् केदारचा प्रतिसाद आवडला.अजुन काही आर्थिक घडामोडीवर भाश्य केले तर वाचायला आवडेल.

केदार, तृतीय वर्गातील उत्पादनाची वाढ व नियम, प्रथम व द्रुतीय वर्गातील उत्पादनाप्रमाणे होत नाहीत (primary and secondary sectors have different rules compared to the tirtiary sector of the economy).. का ह्याबद्दल सबसिडी व शेतकी राजकारणाबद्दलचा जाणकार अधिक सुस्पष्टपणे माहिती देउ शकेल...

छान माहीती. प्रतिसादही माहीतीपूर्ण आहेत. अजून वाचायला आवडेल.

केदार,

प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. तुमच्या काही प्रश्नाची उत्तरे खाली देत आहे.

"कारण लेख हा हे का झाले ह्या पेक्षा, झालेल्या घटनांचा थोडक्यात आढावा असाच जास्त आहे. त्यामागची कारन मिमांसा लेखात नाही".
This writing piece attempts to clearly connect the origin of this bubble to the burst of the previous bubble. And I have listed reasons for this new bubble :
1. उगवत्या राष्ट्रांमधे सधन व्यक्तिंची संख्या वाढू लागली --> more investors, more demand, more risk apetite
2. Greenspan यांनी Interest rate कमी करण्यास सुरवात केली
3. Fannie and Freddie ची Home mortgage market मधली गुंतवणुक कमी झाल्याने Hedge Funds जागा घेऊ लागले --> hedge funds catering to this new class of investors who had increased apetite for risk
4. Technology bubble फुटल्या नंतर investment banks नवीन धंद्यासाठी भुकेल्या होत्या
5. एक नवीन श्रुंखला जन्म घेऊ लागली ....जणु एक घंटा खुर्ची चा खेळ सुरु झाला

"Inflation (महगाई)व real estate चे दरही कमी होतील >> हे तितके पटले नाही "
Logic : Indian economy slowdown --> Job Losses --> consumer class will have less demand --> in a 'perfect' market of supply-demand, the supply side will be affected --> things will be cheaper just to entice the customers or to prop up the demand

"कारण असे बबल आले नाही तर मनी रोटेशन होत नाही हा अर्थव्यवस्थेचा बेसीक नियम. कधी हे बबल अनेक वर्षे टिकून राहते तर कधी फटकन संपते".

अगदी बरौबर ! . हा लेख माझ्या मूळात English लेखाचे भाषातर आहे. त्या लेखाचा शेवट मी असा केला होता...
"One thing is for sure and that is that we all are going to get affected, one way or the other. Let's hope this recovery is speedy and the next bubble , that inevitably will form, we all are able to make work to our advantage !"
------------------------------------
बाकी वाचक,

प्रतिसादा बद्दल धन्यवाद !
--------------------------------

अमित रहाळकर

लक्षवेधक लेख आहे ! मस्त !
साद प्रतिसादही माहिती देउन जातो..

-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks !! तुम्ही म्हणाल जसं..
-::- -::- -::--::--::--::--::-

अमित, नविन विषय आहे इथे वाचायला. अजून लिहि.