अविचार

Submitted by समीर चव्हाण on 9 May, 2013 - 14:10

संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुला रेंगाळुनी पाहू तरी कुठवर
मला तो मार्ग माझा चांगला आहे

कुणास्तव जागणा-या अवदसा रात्री
दिवस एकेक कटणारा भला आहे

तमा नाही, सुखाचे ऊन्ह नाहीतर
व्यथातुर मेघ तृष्णेचा चला आहे

व्वा व्वा, मस्त गझल.

ठळक केलेल्या शेराशी साधर्म्य सांगणारा माझा एक शेर सहज देत आहे

मला माझा बरा होता जरासा लांबचा रस्ता
निघाले अर्थ नाही ते तुझ्या वाटेत येण्याचे

धन्यवाद!

समीर, माफी असावी. पण ही गझल विशेष आवडली नाही. कदाचित माझ्या ध्यानात शेरांचा अर्थ आलेला नसेल. अडखळायला झाले.

सगळ्यांचे आभार.
विजयः
तुझा शेर आवडला.

भूषणः
गझल आवडणे न आवडणे ह्या नंतरच्या गोष्टी आहेत.
गझल वाचल्याबद्दल धन्यवाद.

तुमच्या गझलेतला साधेसोपेपणा मला नेहमीच आवडतो

चला आहे हा शेर जास्त आवडला तो काफियाचा लालित्यपूर्ण (असेच म्हणायचे ना?) वापर केल्यामुळे

इतरही शेर आवडलेच

धन्यवाद.
ह्या जमीनीत अजून तीन शेर लिहिले होते. वेगवेगळ्या मूडचे असल्याने गझलेत समाविष्ट केले नाही. ते असे आहेत:

कुठे आता मला तो भेटला आहे
कुठे अद्याप मनभर बोलला आहे

तुक्याचा बोल हृदयाशी जपावासा
तुक्या थोडाच आम्हा उमगला आहे

चितारी कोण रंगावीण ही चित्रे
कुठे ते हात, कोठे कुंचला आहे

धन्यवाद.

वाह समीरजी
हे तीनही शेर आधी प्रकाशित शेरांपेक्षा फारच उत्तम वाटत आहेत
अधीच नाही दिलेत बरेच झाले की काय असे वाटले ...त्यामुळेच तर खरी... आता वाचायला मिळण्याततली लज्जत ...जी काही औरच आहे ती अनुभवता येतेय

चितारी कोण रंगावीण ही चित्रे
कुठे ते हात, कोठे कुंचला आहे<<<

शेर आवडला. 'रंगावीण' या शब्दाचे नेमकेपण लक्षात आले नाही. पुन्हा वाचतो.

'

रंगावीण' या शब्दाचे नेमकेपण लक्षात आले नाही.

असा विचार केला नव्हता. म्हणायचे इतकेच होते की सृष्टीला चित्रं रंगविण्यासाठी कोणत्याही बाह्य साधनांची गरज पडत नाही अगदी रंगांचीही. कदाचित अधिक चांगले स्पष्टीकरण शक्य असावे.
धन्यवाद.