पावती

Submitted by रसप on 9 May, 2013 - 08:42

ती हसली..
मीही हसलो..
ती हसली म्हणून नाही,
दुसरं काही सुचलंच नाही, म्हणून..
काय करणार ?
माझ्या हातात होती 'बालवाडी'च्या फीची पावती
"रुपये तीस हजार फक्त!"
आणि तिच्या डोळ्यांत होती भूक
अन् रेखाटलेलं रक्त..

"तुम्ही तिला पन्नास रुपये का दिले?"
"ती त्याचं काय करणार?"
"'क्रेयॉन्स' घेणार की 'चॉकलेट' खाणार?"

..... हे प्रश्न मला ऐकूच येत नव्हते..
आणि मला पडलेले प्रश्न
मलाच समजत नव्हते..

घरी जाता जाता सिगरेटचं पाकिट घेण्याचं
आज पहिल्यांदाच विसरलो..

....रसप....
९ मे २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/05/blog-post_9.html

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वाह!!

आवडले, कविता मुद्दाम म्हणत नाही आहे, एक प्रकारचे उत्स्फुर्त वादळी भावनिक चिंतन की असेच काहीतरी वाटले.

मस्तच!

वाह !!!

कविता -- प्रश्न चिन्ह एवढ्यासाठी ...ही केवळ कविता कि आणिक बरेच काही...
तीहसली ... मीही हसले ... म्हणजे ती आवडली
पण हे आपणास नाही ना समजले
मला उमजले. असो ,
प्रतिसाद माझ्या कवितांवर ही दिलात तर फारच आवडेल

आवडली असणार रे !!
ती बाई कितक्या मनापासून लडिवाळ्पणे बोलते आहे बघतरी ..... तुझ्या कवितेशी.
नक्कीच आवडली म्हणूनच असे करत असणार ना !!!