बोन्साय...

Submitted by आनंद पेंढारकर on 4 May, 2013 - 14:03

मी एक बोन्साय
दिवाणखान्यात ताजा
दारासमोरचा तो वटवृक्ष
जुळा भाऊ माझा.....

निर्दय हातांनी ते मुळं माझी कापत आले
फांदयाही माझ्या हव्या तशा वळवत आले
आकारही माझा तेच ठरवत आले.....

मृगाच्या सरींनी अंग नाही शहारलं,
स्प्रेचं पाणी तरीही अंगावर पडत आलं....
उन्हानं कोवळ्या अंग नाही मोहोरलं
टयूबच्या प्रकाशानं तरीही अंग मढत आलं
दूरवरच्या मुळांनी आवडीचं निवडून खाता नाही आलं
खतांचं पक्वान्न तरीही अंगावर चढत आलं

याच सुखांवर मग भाळावं लागलं
पथ्य फक्त एवढंच पाळावं लागलं
मुळं कापली जाताना विव्हळणं टाळावं लागलं
आणि स्वप्न उंच वाढण्याचं उरातच जाळावं लागलं

आनंद पेंढारकर.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विषयातलं वेगळेपण आणि आशयही चांगला आहे,
पण,
मांडणी तितकीशी प्रभावी वाटली नाही.
यमकं जुळवण्याच्या प्रयत्नात गद्यमय/पसरट झाल्यासारखी वाटली.

वैम. कृगैन.