खायचे वांधे, कशाची रे मिठाई?

Submitted by कर्दनकाळ on 3 May, 2013 - 10:58

गझल
उचंबळदाता: प्रसिद्धीअनासक्त, होतकरू, भाषेच्या कत्तलखान्याचे ठेकेदार
श्री बाजीराव मेंगाणे
..............................................................

खायचे वांधे, कशाची रे मिठाई?
काय मर्दुमकी? करू कसली बढाई?

कुंथल्यावरही न होती दोन गझला.....
त्यातही होती चुका....होते बुराई!

काफिये वेचून त्यांचे ढीग करतो;
तोडतो भाषा अशी जैसा कसाई!

शब्दही पाहून मज नाके मुरडती!
मी करू त्यांची किती रे सरबराई?

अस्मिता म्हणती कशाला कोण जाणे?
बिनबुडाचा, बिनगुरूचा मी सवाई!

***************कर्दनकाळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अत्यंत दुर्दैवी प्रकार चालू आहे सध्या मायबोलीवर. ही गझल सामान्य आहे. जिच्यावरून केली ती अतिसामान्य आहे. त्या अतिसामान्य गझलेची दखल घेऊन आपला वेळ खर्चून एक आणखी टुकार गझल रचण्यासाठी प्रोफेसरांनी आपला वेळ का वाया घालवला ? वर्गात टवाळ मुलं असतील तर त्यांना कशा पद्धतीने हँडल करता तुम्ही ? तिथं तुमची सत्ता चालते म्हटल्यावर मुलं भिउन असणार. इथं कोण भिणार ? तुम्ही देत असलेले इशारे आणि प्रत्युत्तरं दिवसेंदिवस हास्यास्पद होत चालली आहेत. इथं तुमच्यासहीत कुणीही सव्रोत्कृष्ट गझलकार नाही. कुणाकडे तंत्र आहे तर कुणाला गझल समजलेली आहे. पण आवर्जून वाचावी अशी गझल एकाचीही नाही. ज्यांची होती ते सध्या इथं येत नाहीत. गल्लीत खेळणा-यानी आयपीएल मधे खेळत असल्याचा आव आणला तरी गल्ली क्रिकेट ते गल्ली क्रिकेटच ! ज्यांची गझल बोलते त्यांच्या पोस्टी वीतभर असतात. ज्यांच्या पोस्टीच किलोमीटरभर लांबलचक असतात त्यांच्याबद्दल सांगायलाच पाहीजे का ?

पोस्टचा कुणाला राग आलाच असेल Lol तर ही पोस्ट खोटी पाडून दाखवा. खटाला आपले शब्द मागे घ्यावेसे वाटतील अशी गझल घेऊन या. खट पायाला हात लावून माफी मागेल.

अशी वेळ येणार नाही या विश्वासाने झोपायला चाललेला खटासि खट.

इथं तुमच्यासहीत कुणीही सव्रोत्कृष्ट गझलकार नाही. कुणाकडे तंत्र आहे तर कुणाला गझल समजलेली आहे. पण आवर्जून वाचावी अशी गझल एकाचीही नाही. ज्यांची होती ते सध्या इथं येत नाहीत

अतिशय दुदैवी विधान आहे.
सर्वोत्कृष्ट असं काहीच नसतं. मायबोली सोडा जगातही सर्वोत्कृष्ट असं कोणीच नाही.
अगोदर कोण महान गझलकार इथे लिहीत होते मला ठाऊक नाही.
असेच एक विधान अज्ञानाने काही वर्षांपूर्वी एका जेष्ठ्यांनी केले होते: भटांनंतर गझल संपली.
भयानक चीड आणि हसू एकाचवेळी आले होते.
सतराव्या शतकातला मोठा कवी वली दकनी एक सत्य म्हणून गेला आहे:

राह-ए-मज्मून-ए-ताजा बंद नही
ताकयामत खुला है बाब-ए-सुखन

नवीन/ताज्या विषयांची कमी नाही.
जो पर्यंत जग आहे तोपर्यंत रचनाशीलतेची/निर्मीतीची शक्यता राहणारच.
शेवटी माझे स्नेही मरहूम शायर सागरसाहेबांचा एक शेर ऐकवतो:

ये बात अपनी तबीयत की बात होती है
किसीके बात का कितना असर लिया जाए

समीर चव्हाण

ही गझल सामान्य आहे. जिच्यावरून केली ती अतिसामान्य आहे.

असे लिहिणारा स्वत:स काय असामान्य समजतो काय?

सामान्यातले असामान्यत्व हेरतो आम्ही!

इथे तर सगळेच असामन्य खुजेपण व कोतेपण!

नुसतेच एकशब्दी लेबल डकवणे सोपे असते! मैदानात या! शेरनिहाय बोला! पलायनावाद सोडा!

पळायचेच होते तर चिवचिवाट तो देखिल डरकाळी फोडल्याच्या आविर्भावात कशाला करायचा?

टुकार गझल<<<<<<<<<,

टुकार बरळणा-याला व वकुब नसताना एकंदर मायबोलीचे भ्रामक ,घाऊक व बिनबुडाचे मूल्यांकन करणा-याला कोणत्याही रचनेला टुकार म्हणण्याचा अधिकारच पोचत नाही!

गझलनिरक्षराने असले दावे करणे केवळ हास्यास्पद आहे!

इथं कोण भिणार ? या तुमच्या प्रश्नामधेच तुमचे गझलनिरक्षरत्व स्पष्ट दिसते!

कुणाला भिवविण्यासाठी, कुणाची खुशामत करण्यासाठी कुणी गझल लिहित नसतो!

तुम्ही देत असलेले इशारे आणि प्रत्युत्तरं दिवसेंदिवस हास्यास्पद होत चालली आहेत
असे आपण म्हणत आहात व वरील प्रतिसादात जे बिनबुडाचे दावे आपण केलेत ते काय कमी हास्यास्पद आहेत?

इथं तुमच्यासहीत कुणीही सव्रोत्कृष्ट गझलकार नाही<<<<<<<<<<<

बाकीच्यांचे माहीत नाही पण आमच्या गझलांना कोणत्याही सोम्यागोम्या गझलअंगठेबहाद्दराच्या प्रशस्ति/प्रगतिपुस्तकाची आवश्यकता नाही!

पण आवर्जून वाचावी अशी गझल एकाचीही नाही
<<<<<<<हा आपला केविलवाणा व खुजा सौंदर्य/काव्यबोध झाला!

गल्लीत खेळणा-यानी आयपीएल मधे खेळत असल्याचा आव आणला तरी गल्ली क्रिकेट ते गल्ली क्रिकेटच !
<<<<<<<<<<<<

गझल लिहिणे हा गझलअंगठेबहाद्दरांना खेळ वाटतो! तुम्ही दिलेल्या या अलंकारिक वाक्यातच तुमचे गझलअज्ञान प्रकटते!

ज्यांची गझल बोलते<<<<<<<<<<<अरे वा! तर तुम्हाला गझलेचे बोलणे पण ऐकू येते तर? खरे नाही वाटत आपल्या वरील बरळणा-या प्रतिसादावरून!

पोस्ट खोटी पाडून दाखवा. धादांत खोट्याला अजून काय खोटे पाडायचे?

राग कशाचा असल्या बिनबुडाच्या पोस्टींची कीवच येते!

भाग्यवान समजा स्वत:ला, आम्ही इतका वेळ तुमच्या फुटकळ प्रतिसादवर लिहिण्यासाठी दडवला!

खटाला आपले शब्द मागे घ्यावेसे वाटतील अशी गझल घेऊन या.
<<<<<<> गझल म्हणजे लावणी नव्हे जिची कुण्या सोम्यागोम्यानेही पागोटे/फेटे हवेत उडवून फर्माईश करावी! होऊन जाऊ द्या जरा फक्कड लावणी एक म्हटल्यागत!

आपली जागा चुकलेली दिसते!

केवढी दांडगाई, बढाई तुझी?
जाण, आहे कुणाशी तुझा सामना!...............इति कर्दनकाळ

मी असा दिसतो नको जाऊस त्यावर.....
जाण तू पडली कुणाशी गाठ आहे!.................इति कर्दनकाळ

अस्मिता म्हणती कशाला कोण जाणे?
बिनबुडाचा, बिनगुरूचा मी सवाई!

अस्मिता असण्याचा/ नसण्याचा आणि एखाद्याला गुरू असण्याचा/नसण्याचा नक्की काय संबंध आहे?

असो....
>>गझल म्हणजे लावणी नव्हे जिची कुण्या सोम्यागोम्यानेही पागोटे/फेटे हवेत उडवून फर्माईश करावी! होऊन जाऊ द्या जरा फक्कड लावणी एक म्हटल्यागत!
आपली जागा चुकलेली दिसते!<<<

ह्याच्या पाठोपाठ

केवढी दांडगाई, बढाई तुझी?
जाण, आहे कुणाशी तुझा सामना!...............इति कर्दनकाळ

मी असा दिसतो नको जाऊस त्यावर.....
जाण तू पडली कुणाशी गाठ आहे!.................इति कर्दनकाळ

त्यांची जागा नक्की चुकली होती का?

धन्यवाद भूषणराव!
विशेषणे पाहिलीत का पहिली?
युद्धाला सज्जच असतात कर्दनकाळ नेहमी!

गझलयोद्धेच आहेत ते!
टीप: आमचा,या धाग्यावरचा शेवटी दिलेला हजामात्मक प्रतिसाद जरूर डोळ्याखालून घाला!

****************इति कर्दनकाळ

अस्मिता म्हणती कशाला कोण जाणे?
बिनबुडाचा, बिनगुरूचा मी सवाई!

समग्र शेराचा सुलभ गद्य अर्थ:
ज्या माणासाला स्वत:च्या स्वत्वाची/अस्मितेची चाड नाही, ज्याला कुठलेही बूड नाही/पाया नाही/ जो उथळ आहे, अशा माणसास गुरू मिळणेही अशक्यप्रायच असते कारण चांगला गुरू मिळायलाही पुण्याई लागते, म्हणून जो बिनगुरूचाच असतो/ राहतो असा माणूस स्वत:ला सवाई समजत आहे व तसे घोषितही करत आहे! असे व्यंगात्मक उद्गार या शेरात काढले आहेत!

त्यांची जागा नक्की चुकली होती का?<<<<<<<<<<<

आमचा वरील प्रतिसाद सावकाश वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल!
सदर प्रतिसाद दात्याच्या प्रतिसादची ढब बघता त्यांची जागा चुकलेलीच आहे हे निश्चित!
लावणीचे उदाहरण हे डोळ्यात अंजन घालणारे आहे सूज्ञ माणसाच्या!
एरव्ही नंगेसे खुदा भी डरता है..............म्हणतात!

याच धाग्यावर पुन्हा प्रतिसाद द्यायचा नाही हे खटाने स्वतःला बजावून ठेवलं होतं. खटाच्या प्रतिसादावर कुणी लिहील असं वाटलं नव्हतं. प्रोफेसरांचे प्रतिसाद हे आताशा कुणी वाचत नाही. त्या प्रतिसादातली ग्यानबाची मेख प्रोफेसरांच्या ध्यानात यावी ही अपेक्षा नव्हतीच. त्यांच्या मते, त्यांनी प्रतिवाद वगैरे केला आहे. मी अ‍ॅडमिन असतो तर या धाग्यावर गझल विभागाबद्दल जी मतं व्यक्त होताहेत ती गझलकार वाचताहेत कि नाही याची कल्पना नाही. गझल विभागाचा अक्षरशः उकीरडा झालेला आहे. उकीरड्यात रमणारे प्राणी गेल्या काही दिवसात गझलेमधून दिसू लागले आहेत. शीर्षकात अशा प्राण्यांचा उल्लेख होऊ लागलेला आहे. त्या वेळी निषेधाची एकही पोस्ट एकाही जबाबदार गझलकाराला का टाकाविशी वाटली नाही ? अमूक एकाने लोळण घेतली मग आम्ही घेतली तर काय बिघडतं हा पवित्रा घेतल्यानेच गझलेतल्या प्राण्यांना आदर्श अशी स्थिती इथे निर्माण झालेली आहे. खटाचे प्रतिसाद मनावर घ्यायचे कि नाही हा त्यांचा प्रश्न आहे.

या प्रतिसादांचा राग योग्य पद्धतीने यावा म्हणूनच चांगली गझल घेऊन या म्हटलं होतं. कदाचित खटाचं म्हणणं खोटं पाडावं अशी सुबुद्धी सर्वांना होईल असं वाटलं होतं. पण आता खात्रीच पटत चालली आहे कि खटाला माफी मागायची वेळ कधीही येणार नाही. Lol खटाचं म्हणणंच समजत नसेल तर आनंदच आहे. Proud

( ज्यांची गझल खणखणीत आहे त्या काही मोजक्या गझलकारांचा अपवाद आहे. त्यांची आधीच माफी मागतो. ज्याची गझल बोलते त्याच्या प्रतिसादात फक्त धन्यवाद इतकाच शब्द येईल. हातभर लांबीच्या पोस्टसची गरज पडत नाही त्यांना ) .

<<< नवीन/ताज्या विषयांची कमी नाही.
जो पर्यंत जग आहे तोपर्यंत रचनाशीलतेची/निर्मीतीची शक्यता राहणारच.>>>

अगदी खणखणीत सत्य बोललात समीर जी...

सध्या खूप सुंदर गझल लिहिणारे उदयाला येत आहेत.

दुस-याच्या लिखाणावर उगाच तोंडसुख घेण्यापेक्षा आपणच म्हणावी एखादी सुंदर गझल...

ज्यांची गझल खणखणीत आहे त्या काही मोजक्या गझलकारांचा अपवाद आहे. त्यांची आधीच माफी मागतो<<<<<<

ओके ओके !! मी केलंय माफ ........ Wink

खटाच्या प्रतिसादावर कुणी लिहील असं वाटलं नव्हतं.<<<<<<<<<<
केवढा हा भ्रम! ओव्हर/खोटा आत्मविश्वास!
प्रोफेसरांचे प्रतिसाद हे आताशा कुणी वाचत नाही.<<<<<<<<<<एक गोड गैरसमज
काव्यकर्णबधिरते बरोबर काव्यदृष्टी देखिल अधू दिसत आहे खटाची!


त्या प्रतिसादातली ग्यानबाची मेख
डोंबलाची मेख! हास्यास्पद बरळण्यात कसली आली मेख वगैरे?
त्यांनी प्रतिवाद वगैरे केला<<<<<<<<चिलटांचा वाद तो काय आणि प्रतिवाद तो काय?
खरडपट्टीला/हजामतीला प्रतिवाद म्हणत नाहीत!


मी अ‍ॅडमिन असतो तर
पात्रतेनुसारच माणसाने स्वप्न पहावे!

या धाग्यावर गझल विभागाबद्दल जी मतं व्यक्त होताहेत ती गझलकार वाचताहेत कि नाही याची कल्पना नाही.
कशी येणार कल्पना? त्याला डोळे उघडे असावे लागतात!

गझल विभागाचा अक्षरशः उकीरडा झालेला आहे.
आपल्यासारखे आहेत ना उकीरडे फुंकरणारे इथे!

उकीरड्यात रमणारे प्राणीगाच आपले वर्णन दुस-यांना डकवू नका! आपली ही असाहित्यिक वळवळ सर्व काही सांगते!

पवित्राकिडे, मुंग्याचा कसला आला पवित्रा?
खटाचे प्रतिसाद<<<<<<<<<
वळवळणा-या किड्याची कसली आली साद आणि कसला आला प्रतिसाद?

खटाला माफी मागायची वेळ कधीही येणार नाही.चिलटे/डास/किड्यामुंग्यांना/झुरळांना कसली आली माफी?

ज्यांची गझल खणखणीत आहे<<<<<<<किडे देखिल हवेत गोळीबार करू लागले?माफी मागू लागले?

ज्याची गझल बोलते त्याच्या प्रतिसादात फक्त धन्यवाद इतकाच शब्द येईल. हातभर लांबीच्या पोस्टसची गरज पडत नाही त्यांना ) .<<<<<<<

कोणती मोजपट्टी? हाताची? अरेरे केवढा हा काव्यबधिरपणा?

दोन कामयाब शेर लिहून दाखवावेत मग जीभ टाळ्याला लावावी!
फुकटची तोंडाची वाफ दवडण्यात काय अर्थ आहे?

*************इति कर्दनकाळ