साधकांच्या कथा

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 1 May, 2013 - 08:36

वाचता अद्भुत l साधकांच्या कथा l
दाटे मनी व्यथा l उगाचच ll १ ll
काय त्यांचे भाग्य l वाटतसे हेवा l
माझ्या वाट्या देवा l येईल का ? ll २ ll
तैसे ते वैराग्य l तैसे समर्पण l
कधी का घडेन l जीवनी या ? ll ३ll
तैसी गुरु भेट l कृपेचा पाऊस l
साधनेची हौस l फिटेल का ? ll ४ ll
तैसी तीर्थ यात्रा l सज्जनांचा संग l
विरक्तीचा रंग l चढेल का ? ll ५ ll
तैश्या विरहात l जळेल जीवन l
माझे रात्रंदिन l कधी देवा ? ll ६ ll
तैश्या त्या प्रेमान l जीवन सजून l
येईल भरून l तुझ्या ठायी ? ll ७ll
व्याकूळ अंतर l झाले तुझ्याविण l
द्वार का अजून l मिटलेले ? ll ८ll

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तळमळ छानच प्रकट झाली आहे.

तैसी गुरु भेट l कृपेचा पाऊस l
साधनेची हौस l फिटेल का ? ll ४ ll >>>> साधनेची हौस कधीच फिटू नये - आधी होता संतसंग | तुका झाला पांडुरंग | त्याचे भजन राहीना | मूळ स्वभाव जाईना ||

वाचता अद्भुत l साधकांच्या कथा l
दाटे मनी व्यथा l उगाचच

अशी व्यथा असण्याला भाग्ययोग म्हणतात ! ती पुरेशी तीव्र नसते हे दुर्भाग्य.

फार सुंदर.

तैसे ते वैराग्य l तैसे समर्पण

वैराग्य आणि समर्पणाची हौस बाळगणारे या जगात तुरळकच. या कवितेने आज आठवण करून दिली.

धन्यवाद. Happy

वि प्र वर !
तळमळ खरीच आहे, त्यामुळे कवितेला जोर आलाय, खूप छान आहे , जावे त्याच्या वंशा . . . . छान !
______________________

तळमळ छानच प्रकट झाली आहे.

> > > > पहा-पहा , कोण बोलतंय ! ! ! !

vijaya kelkar ,अगदी खर.धन्यवाद .