आजही..

Submitted by रसप on 29 April, 2013 - 04:22

पहिल्या स्पर्शाला ओझरते आठवतो आजही
शेवटच्या स्पर्शास विसरताना रडतो आजही

सोबत असते निरिच्छ काळी रात्रच ही नेहमी
मी पणतीसम शांतपणे जळतो विझतो आजही

कुणीच फिरकत नाही येथे, भेटणार ना कुणी
माझ्या अस्तित्वाची आशा बाळगतो आजही

कुठे झोपड्या, इमारती वा महाल वा बंगले
माणुस असलेला माणुस ना आढळतो आजही

एक महात्मा जो सत्याच्या कामी आला कधी
नोटेवरचा फोटो सारे आठवतो आजही

झळा सोसतो, वार झेलतो, कधी न हरतो 'जितू'
आशिक़ केवळ नकार ऐकुन तडफडतो आजही

....रसप....
२८ एप्रिल २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/04/blog-post_29.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिलकधारी आला आहे.

नोटेवरचा फोटो सारे आठवतो आजही<<< फोटोला सारे आठवते की फोटोमुळे शायराला सारे आठवते?

तिलकधारी निघत आहे.

कुठे झोपड्या, इमारती वा महाल वा बंगले
माणुस असलेला माणुस ना आढळतो आजही

एक महात्मा जो सत्याच्या कामी आला कधी
नोटेवरचा फोटो सारे आठवतो आजही

हे दोन काय आहे नक्की ?

माणूस हा शेर सर्वात विशेष वाटला.

"एकुण ठीकठाक वाटली. (अपेक्षा जास्त आहेत)" >>> बेफीजींच्या या मताशी बर्‍याच अंशी सहमत.

पहिल्या स्पर्शाला ओझरते आठवतो आजही
शेवटच्या स्पर्शास विसरताना रडतो आजही
... विरह फार सुंदर उतरला आहे.

सोबत असते निरिच्छ काळी रात्रच ही नेहमी
मी पणतीसम शांतपणे जळतो विझतो आजही
... चांगला झालाय.

कुठे झोपड्या, इमारती वा महाल वा बंगले
माणुस असलेला माणुस ना आढळतो आजही
..... सुरेख

एक महात्मा जो सत्याच्या कामी आला कधी
नोटेवरचा फोटो सारे आठवतो आजही
.... अजून चांगला होऊ शकला असता.