शेकडो रुग्ण तपासतांना ..

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 25 April, 2013 - 08:51

शेकडो रुग्ण तपासतांना
रोगांच्या साथीत
वेढलेले असतांना
नातेवाईकांच्या झुंडी
अंगावर झेलतांना
गुंड पुंडांना तोंड देतांना
एकच असते भिस्त
एकच असतो आधार
एक तारखेपर्यंत
बेंकेत पडेल पगार .

तसे काम छान आहे
मित्र मंडळीत मान आहे
घातल्यावर अॅप्रन वाटे
देवाचेच वरदान आहे .

पण जेव्हा पडते कानावर
न केलेल्या चुकीमुळे
मृत्यूच्या खेळामुळे
सस्पेन्शन आले मित्रावर
काळे फासले गेले तोंडावर
अॅप्रनमधील हवा निघून जाते
तोफेच्या तोंडी आहोत
असेच अन वाटू लागते
घरी जाणारा प्रत्येक पेशंट
घरी गेल्यावर ..
मरेन असे वाटू लागते
आपल्या ड्युटीत जर
काही असेच झाले तर
या वयात काय करायचे
चाळीस पन्नाशीत
तोड कुठे वेंगाडायचे
घराचे कर्ज कसे फेडायचे
मुलांचे शिक्षण कसे करायचे
हळू हळू येणारा प्रत्येक
पेशंट शत्रू वाटू लागतो
भरलेल्या कॅजुल्टीचा
वीट येवू लागतो
वाटते हॉस्पीटल सोडून
दूरवर पळून जावे
याला त्याला पैसे देवून
वा कुणा वशिला लावून
दवाखान्यात बसावे
सर्दी खोकल्याचे “चांगले”
पेशंट रोज पाहावे
पण ओळख लागत नाही
देणे घेणे जमत नाही
म्हणून त्याच चक्रात
राहतो गरगर फिरत
लोक जरी म्हणती
चांगला डॉक्टर आहे
आमचा जीव वाचवतो
त्यांना काय माहित
रोज तो मरत असतो .

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad

तुमच्या कविता वेगळ्याच असतात. कविता वाचून आपण डॉक्टर असाल असा समज झालाय. या पेशाचं दु:खं अतिशय चांगलं मांडलंय.

आवडली, पण आवडली अस म्हणता येत नाहीये Sad
ईंटर्न असताना वाटत, पीजी ला प्रवेश मिळु दे, सगळ बदलेल. रेसिडेंसी संपुदे , मग सुपरस्पेशालिटी म्हणजे सगळ बदलेल. त्यानंतर कंसलटंट झाल तरीही तेच?

छान

धन्यवाद कैलासजी, किरणजी, भुलभुल्लयाजी,इब्लिसजी .
किरणजी,समज बरोबर आहे .
भुलभुल्लयाजी, अभिप्राय पोहचला .

कविता वेगळी,वास्तवदर्शी अन फारच सुंदर..मला वाटतं डॉक्टर असो वा बँकर, अतिसंवेदनाशील माणूस नेहमीच अगणित ओझी वाहत जगतो..हे कवीमन जे कवितेची निर्मिती करतं त्याचंच बाय प्रॉडक्ट म्हणजे आत्मछळ.

<<<<<डॉक्टर असो वा बँकर, अतिसंवेदनाशील माणूस नेहमीच अगणित ओझी वाहत जगतो..हे कवीमन जे कवितेची निर्मिती करतं त्याचंच बाय प्रॉडक्ट म्हणजे आत्मछळ.>>>>>>>भारतीताई, किती सहज कवितेच तत्वज्ञान सांगून गेलात तुम्ही. ग्रेट.
जयश्रीजी उत्स्फूर्त प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद .

कविता पोचली.

मला वाटतं डॉक्टर असो वा बँकर, अतिसंवेदनाशील माणूस नेहमीच अगणित ओझी वाहत जगतो..हे कवीमन जे कवितेची निर्मिती करतं त्याचंच बाय प्रॉडक्ट म्हणजे आत्मछळ.
>>> व्वा!!! हा [प्रतिसाद फारच पटला...