टांगारु आली ( विडंबन )

Submitted by उद्दाम हसेन on 22 April, 2013 - 06:29

एक स्त्रीआयडी धारिका गटगला गेली. पण काय घोळ झाला, तिला टांगारू नाव का मिळाले आणि तिची अवस्था काय झाली याची कारुण्याने ओतप्रोत भरलेली ही काव्यकथा. ड्युआयवर देखील असा प्रसंग येऊ नये.
(डिसक्लेमर : कुठल्याही जिवंत, मृत अथवा मृतात्म्याशी वा प्राण्याशी या कवितेचा कसलाही संबंध नाही. बादरायण संबंध जोडल्यास पूर्ण प्रोत्साहन देण्यात येईल मात्र जबाबदारी झटकली जाईल. धन्यवाद.)
====================================================================

पडेना छाया अशी ही काया,
पुनव लॊगिन झाली,
सुलटे पाऊल, उलटे करुनी
आयडीस्वाहण्या आली.

टांगारु आली, चिंचेवरुनी खाली
पाहुनी आली, गटगण्याची थाळी ,
उदरी झाली, भुकेने कावळकावळी
मिळेना कोणी, आयडी वेळेवरती
सुकूनी गेली, अजूनी फिरे भवताली.

टांगारू आली, पळा चिकन सोडुनी
राहू द्या हड्डी, तशीच दाताखाली.
टांगारु आली..

गेल्या वेळेला, जरी वेळेला, गटगच्या स्थळा, आली ही नार
पाहिल्या चुकुनी तारखा, सालच्या गेल्या, लावुनी बार
शेवटी, गटांगळी तटी, खपाटी पोटी , सोसेना भार

शर्करा, कमिरली नाडी, मिळे ना हाताची
फेफरे, बोबडी वळली, तशात पोरीची

मी डोसा नि इडली, मागुनी थकली, खाद्यसभा भवताली
ही पडली रडली, अशी उलथली, सांडली अन्नमहाली

टांगारू आली, झाडावरुनी खाली
झपाटण्या आली, तिच्या नावची डमी
ती हलकी गाली, देतसे गटांगळीवेळी
टांगारु आली, पुनवलॉगिन झाली

- Kiran..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rofl

किरूबाबा की जय हो... Lol

पडेना छाया अशी ही काया,
पुनव लॊगिन झाले,
पाऊल सुलटे, करून उलटे
चिंचेवरुनी खाली Wink

किरण्या म्हंजी भयंकर्.......वाटलेलच्........अगदी ट्रेडमार्कच..... Rofl

नुकत्याच स्विकारलेल्या नव्या प्रणालीतील सेटींग्जमुळे मऊ यांचा प्रतिसाद दृपालद्वारे सर्वात वर आणण्यात आला आहे.

Rofl
ओळीओळीला हसलो
__________________________________________
आजवर हास्यलावणी कधी कल्पिलीही नव्हती वाचणे.. ऐकणे फारच दूरची बात !! (लावणी विडंबन म्हण हवे तर !!!)
किरण मराठी भाषेला ही तू दिलेली देणगी आहे हे कधीही विसरू नकोस

या रचने साठी ..................
_________________/\_________________

अरे ते सुरूवातीला-
लेलेले नंतर टांगारू आ'ली' चुकतय ना....

लीकारान्त शब्द हवेत आधी, मग आली.. म्हणून मी तसं लिहीलंय वर...
गद्य भाग नीट कर पाहू Wink

अप्सरा आली या गीताचं विडंबन आहे हे. प्रताप नवलकर ने याआधी याच गीताचं विडंबन केलंय.

http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=3_sCh4kx-Lk

गाण्याची चाल प्रत्येक कडव्यात बदलत असल्याने ( आणि नंतर लक्षात राहत नसल्याने) इथे ते ऐकून त्या चालीवर विडंबनगीत म्हणण्याचा प्रयत्न करावा ही विनंती.

बागेश्री
अगदी मान्य आहे. मला ते शब्द आवडल्याने मोह आवरला नाही Wink डन डना डन.
गद्य भाग नाहीये यात. काही ठिकाणी चाल जरा क्लिष्टच आहे.

आई शप्पथ!!! मी हे वाचलच नव्हत....कसलं भारी आहे....
किरण लेका तु महान आहेस ... असाच लेखनावर लक्ष केंद्रित कर .... वुई वाँट यु टु राईट फॉर अस Happy