आषाढी

Submitted by अज्ञात on 22 April, 2013 - 01:07

दाट दाटल्या जुन्या मैफिली काळ थांबला नाही
शरिर जाहले जीर्ण मनी साचल्या सावल्या कांही
बोल अबोलच आणि चाहुली पंख मिटून विदेही
टिपुर चांदणे चंद्राविण नभ अवसेचे संदेही

रूक्ष तरी शीतल वाटे एकांत दिशांना दाही
छाया पडछाया माळावर वृक्ष जरी न तिथेही
कोण सोसते पोसते सुखे घाव झेलते देही
आभाळ अंबरी आषाढी माया ममता कविता ही

..............................अज्ञात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकेका महिन्यावर एकेका ऋतूवर एक एक कविता अशी आपली योजना हल्लीच्या काही रचनांमधून पहावयास मिळाली
एखाद्या नव्या संग्रहाचे काम चालू आहे की काय !! शुभेच्छा व आधीच अभिनंदन Happy

ही कविताही छानच आहे आवडली

बोल अबोलच आणि चाहुली पंख
मिटून विदेही
टिपुर चांदणे चंद्राविण नभ
अवसेचे संदेही>>>
खरोखरच मनाला शांतवून गेली..
सुंदर