राजा, प्रधान आणि माकड; एक जुनी कार्टून फिल्म

Submitted by अवल on 20 April, 2013 - 08:28

मला आठवतं, १९८०-९० च्या सुमारास नॅशनल टिव्ही वरती एक कार्टून फिल्म लागायची.
ज्यात एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट होती. एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो, राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो- एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते.
एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... उप्स... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो...

अशी काही गोष्ट होती. हिंदीत होती, डब केलेली की नाही माहिती..
पण त्या राजा, प्रधान सगळ्यांची वेशभूशा भारतीयच होती. माझ्या आठवणीतील कार्टुन्स मधली ती सर्वात पहिली आवडती कार्टून होती. फार छान होती. मला ती पुन्हा बघायचीय, मी सर्च केले नेट वर पण नाही सापडली. कोणाला माहिती आहे? मला कोठे बघता येईन? त्याचे निर्माते कोण ? प्लिज मदत करणार ? धन्यवाद !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद दिपा. गोष्ट हीच पण कार्टुन फिल्म वेगळी होती. खुप फाईन होती ती. आणि कपाळावर हात मारणारा प्रधानजू हिट होता त्यात. पण ह्या ही छान आहेत. धन्स Happy