घन उष्ण पिवळा (घनःशाम सुंदरा - विडंबन)

Submitted by दाद on 18 April, 2013 - 23:41

घन उष्ण पिवळा पीवळा
पडसोदय झाला
धरी लवकरी रुमाला, रुमाला
धरी लवकरी रुमाल नासिकातळी श्लेम आला॥

आणुनद्या लॉजिंजीस, ही बाटली
व्हिक्सची सरली
करी गार्गल मिठ-पाणी घेउनी
रेकी घसा शेकी
"गरम शेण लेपा" देती कुणी अचरटसा सल्ला.......॥१||

सायंकाळी एकेवेळी
खो-गो अवघे भक्षी
अरुणोदय होताच जळाची
गरम पिशवी कुक्षी
प्रभातकाळी उठुनी लावली
सुंठ निज वक्षी
करुनी सडा युकॅलिप्टस, झोपी.....
गुंडाळुन मफलरशी
शिंका, ताप, पडसे, ..... बरा हा होईल कधी खोकला?.......॥२||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'दाद' नी हे असे लिहावे, इथे पोस्टावे ते नाही भावले,

पण तरी

दाद ने हे स्वतःच्या(च) नावावर इथे प्रसिध्द करण्यास अजिबात कचरू नये हे खूप आवडले.

आपल्या, माणूस व कलाकार म्हणून असणाऱ्या (चुका करण्याच्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या, आपल्या कथित इमेज मध्ये अडकून न पडण्याच्या) सर्वाधीकारांना शाबूत ठेवण्याच्या ह्या स्वभावाला / प्रवृत्तीला कोटी कोटी सलाम!

दाद ?

दाद द्यावी लागेल तुमच्या ( अ ) कलेची ? वय जास्ती नसावं ! आणी असलं तरी म्हणावी

तेव्हढी बुद्धीची वाढ . . . . .असो.

एक सुंदर भुपाळी, तिसुद्धा श्रीकृष्णा साठी लिहीलेली आणी गाइलेली, तीची विडंबना ?

तेही अगदी श्लेम आणी गरम शेण काय - काय ? अगदी एक शारिरिक रोग / आजार ह्याचा आधार घेउन देवाच्या नावाची विडंबना करायला धजलात ?

अहो मग शेण बाहेर गळ्यावर कशाला लेपायचं ? सरळ घश्यातच . . . .? केलं नसलं तरी लिहुन तसंच सुचवलं गेलं आहे.

मला मनापासुन वाटंत होतं कि ईथे मा.बो. वर फार सुशिक्षित विचारांचे सदस्य असतील . . . . पण एखादा ( आणखीन असतील ! येतील धावुन अंगावर आत्ता . . . . ) अपवाद ईथेही आहेच कि !

मी तुमची मनापासुन क्षमा मागतो हे असं लिहीण्यासाठी, पण ख्ररंच एकदा विचार करुन पहा ! ! ! !

श्रीकृष्ण कोण हे माहित असेल ( कि परदेशात जाउन आपले मूळ विसरलात ? ),तर एक काम करा. . . . आपले डोळे मिटुन घ्या ( हात जोडायचीही गरज नाहि ), जगातले सर्व विचार बाजुला ठेवा, श्रीकृष्णाचे ध्यान करायला सुरुवात करा.... त्या मूर्तिचे रुप डोळ्यांसमोर आणायचा अटोकाट प्रयत्न करा, त्याला मनापासुन हाक द्या ! मन संपूर्ण एकाग्र करा, त्या सुंदर मेघांप्रमाणे श्यामवर्णि श्रीकृष्णाला पुन्हा बोलवा. . . . हा तुमच्या मन:चक्षुंसमोर तुम्हाला दिसेल, मंद्-मंद हास्य त्याच्या सुंदर तेजस्वी मुखावर दिसेल. . . . हाच तो, ह्या चराचराचा आदी प्रवर्तक, ह्या संपूर्ण विश्वाला आधार हाच तो, अगणित लोकांच्या श्रद्धेचा आणी विश्वासाचा केंद्र, त्यांच्या भक्तिचा मूळ परमेश्वर . . . .
हाच तो घनःश्याम ज्याच्या भुपाळी ची तुम्हि खूप मनापासुन विडंबना केलित.

एक महत्वाची गोष्ट नेहेमी लक्षात राहु द्या आता , हे जे विडंबनचे कर्म तुम्ही केले आहे, त्याचे फळ चुकणार नाहिच, कदचित अजुनही नसेल नीट ध्यानात आलं, वा अजुनही वाटत असेल कि तुम्ह जे केलं त्यात वावगं काहिच नाहि . . . . तर तुम्ही देवापेक्षाही महान, नाहि का ?
दाद ! सुशिक्षित आहात, आपल्या कलेचा उपयोग करा, ह्या तुम्हाला लाभलेल्या अतिरिक्त गुणाचा चांगला उपयोग केलात तर त्यात वाढ होईल, असा दुरुपयोग केला कि कला नष्ट होणार......
कुठल्या ही एका गाण्याच्या बोलांना बदलुन त्याचे एका सुंदर देवस्तुतीपर गद्य बनवून पहा कि ?

संत कबीर ह्यांच्या दोन ओळी आठवल्या. . . . तुमच्यासाठी ईथे देतो आहे..... अर्थ उमजुन घ्यावा ही विनंती . . . .
" कैसे चल रहे थे कबीरा | पग ऊपर, तल शीश |
मृत मंडल पर आयकर | भूल गयो जगदीश ||"

विडंबन यथातथाच वाटले.

अद्याप कोणाचाही अध्यात्मिक ईगो दुखावून पोस्टी कशाकाय पडल्या नाहीत असे वाटत होते. परंतू परब्रह्मांनी ती उणीव दूर केली.

खवटू ,
इगो अजिबात नाही. इगो म्हणजे काळे धन, माणूस खूप साचवू शकतो पण ते उपयोगी अजिबात नाही. पण तुम्ही काय याची वाट पहात . . . ? हम्म . .

रिया,
आता मी काय उगाच " छी ", केली ईथे ?

अरे आता तुम्ही सगळे . . . . असं कसं काय करता ?
मी क्षमा मागतो ( बिना इगो....खवटू ! ) सर्वांची, मी फक्त एका विडंबनेची विडंबना केली !
आधीची विडंबना एक पद्य होती, नंतरची विडंबना मी गद्यात केली.

'हे' आणि 'असं' लिहिण्यात माझं मन जराही कचरलं नाही. इथे पोस्टण्यातही नाही. विडंबन कवितेचं आहे त्यातल्या भक्तीभावाचं नाही.
मी आणि माझं जे आहे ते "मी आणि माझं परब्रह्मं" ह्यातलाच व्यवहार आहे.
मायबोलीकर परब्रम्ह,(परब्रह्म हा आयडी कुणी घेतला नसेल तर तो घ्या. कारण तुमच्या आयडीतला ब्र'ह्मं'.. 'म्ह' झालाय... ते ब्रह्मातला "ह्म" हवा.) तुम्हाला ह्या विडंबनानं दु:ख झालं असेल तर मला खरच माफ करा. मी त्यासाठी बिनशर्तं माफी मागते. तुम्हालाच काय कुणालाच दुखवणं हा हेतू नाहीच.
हे विडंबनच काय माझ्या कोणत्याही कर्माचं फळ मला चुकणार नाहीये ह्याची नुक्त्या घेतलेल्या श्वासाइतकी मला खात्री आहे. अन तरीही ह्या काव्याचं विडंबन करण्याची बुद्धी हा 'त्या'च्या-माझ्यातला व्यवहार आहे ह्याची मला संपूर्णं खात्री आहे... त्यासाठी मला किंचितही अपराधी वाटत नाहीये हे खरय.... काय करू?
पुन्हा एकदा तुम्हाला झालेल्या मनस्तापाची माफी मागते. माझ्यासाठी इतकं पुरेसं आहे.

दाद, उत्तर छान दिलंयस. पण देण्याची काहीही गरज नव्हती. ड्युआयड्यांना कसली उत्तरं देत बसतेयस? त्यापेक्षा अजून एक विडंबन कर पाहू!

मामी, मी त्यांचं मन दुखावलं गेलं असल्यास... माफी मागितलीये. तो आयडी ड्यु असेल पण त्यांचा तडफडाट फार ओरिजिनल आहे. त्यांच्यातल्या त्या भोळ्या भक्तीभावाला नमस्कार... अन त्याला ठेच लागली असेल म्हणून त्या भक्तीभावाची माफी.
"तुम्हा-आम्हा ठावा काय ते काय मायबापा" हे एकदा कळलं की, आयडींचा किंवा त्यांच्या आयडियांचाही राग येत नाही.
बाकी इथल्या अ‍ॅडमिननं उडवायचं ठरवलं तर कोण दाद अन कोण परब्रम्ह (तो म्हशीतला म्ह फार्फार खटकतोय) Happy

दाद, तुझा अ‍ॅप्रोच खूप आवडला Happy

विडंबन जरा ओढून ताणून वाटल्यामुळे आवडलं नाही. तुझ्या बाकीच्या लिखाणाची मी फॅन आहे हे सांगणे न लगे.

परब्रह्म, तुम्ही एकदा ह्याच 'दाद'ची 'सखा' ( http://www.maayboli.com/node/3514 ) वाचाल का? Happy

भन्नाट ! लिहीले आहे. त्या भूपाळीला अनुसरुन असेल असे लगेल लक्षात आले नाही.
प्रतिसाद संपादित करण्याचा मानस होता, परंतू झालेल्या विडंबनाची आपण बिनशर्त माफी वाचुन तुमचा मोठेपणाही तेवढाच आवडला !

केश्विनी थँक्स
तुझ्यामुळे दादची अप्रतिम कथा वाचायला मिळाली
परब्रम्ह वाचाच खर ही कथा
सगळे फिटून जाईल मनातलं

दाद खर सांगायच तर हे ओढून ताणून आणलेल विडंबन वाटल
तू अजून चांगल लिहू शकतेस पुलेशु

"मामी, मी त्यांचं मन दुखावलं गेलं असल्यास... माफी मागितलीये. तो आयडी ड्यु असेल पण त्यांचा तडफडाट फार ओरिजिनल आहे. त्यांच्यातल्या त्या भोळ्या भक्तीभावाला नमस्कार... अन त्याला ठेच लागली असेल म्हणून त्या भक्तीभावाची माफी.
"तुम्हा-आम्हा ठावा काय ते काय मायबापा" हे एकदा कळलं की, आयडींचा किंवा त्यांच्या आयडियांचाही राग येत नाही. बाकी इथल्या अ‍ॅडमिननं उडवायचं ठरवलं तर कोण दाद अन कोण परब्रम्ह (तो म्हशीतला म्ह फार्फार खटकतोय) " >>>> दाद, खूप आवडला तुमचा प्रतिसाद.

तुमच्या या प्रतिसादाला मी एकच दाद देऊ शकतो _____/\_____

सचिनने नेहमी सेंच्यूरीच मारावी ही अपेक्षा भाबडी असली तरी तो मारील ही खात्री असते म्हणून प्रेक्षक तशी अपेक्षा ठेवतात.

अपेक्षेला उतरले नाही तरी संयमाने सिच्युएशन हँडल करण्याचे सचिनला तुम्ही शिकवलेले आहे काय दाद?

Happy

मामी, मी त्यांचं मन दुखावलं गेलं असल्यास... माफी मागितलीये. तो आयडी ड्यु असेल पण त्यांचा तडफडाट फार ओरिजिनल आहे. त्यांच्यातल्या त्या भोळ्या भक्तीभावाला नमस्कार... अन त्याला ठेच लागली असेल म्हणून त्या भक्तीभावाची माफी.
"तुम्हा-आम्हा ठावा काय ते काय मायबापा" हे एकदा कळलं की, आयडींचा किंवा त्यांच्या आयडियांचाही राग येत नाही. >>>>>
>> असा विचार फक्त दाद आणि दादच करु शकते ..... दाद यू आर ब्लेस्ड वन् ...
मन किती निर्मळ, विशाल असावं याचंच जणू प्रत्यंतर आलं .........

अश्विनी, थॅन्क्स... गं.

बाप्रे.. उल्हास, विजय, शशांक... काय हे. असलं काही नस्तं.
मी ब्लेस्ड आहे हे मात्र नक्की Happy

कृपा करुन तुम्ही सर्वजण माझा तळतळाट घेऊ नका.

म्ह हा म्हशीत असला तरी मी त्या म्हशीतल्या म्ह , ला माझ्या आयडी मध्ये ( ओहो ! चुकलं , ड्यु-आयडीत ) स्थापित केला आहे.
आणी ते परब्रम्ह असो वा परब्रह्म ! समजण्यामध्ये चुक नाहिये, त्यामुळे मी त्यास दगड म्हणुन ( क्षमस्व, हा म्ह आपल्या मराठीत पुष्कळदा येतो नाही ? ), जरी संबोधले तरी त्याने काही बदलणार नाही.

संत ज्ञानेश्वराने ह्याच तुम्हाला खटकण्यार्‍या "म्ह", जातिच्या रेड्याच्या तोंडुन ऋचा म्हणवुन ( पुन्हा म्ह आलाच ? ) दाखविल्या होत्या. कारण हे परमतत्व सर्वत्र आहे. त्याकाळचा तो समोर उच्च आसनावर बसलेला ब्राम्हण ( पुन्हा म्ह ? ) समाज आपली आसनं सोडुन त्या लहानग्या ज्ञानेश्वराच्या चरणांवर नतमस्तक झाला होता.

ह्याच्याच पाठीवर बसुन धर्मराज यमधर्म आपली कार्ये तुम्ही विडंबित केलेल्या देवाच्या आज्ञेने करतो.

अहो एव्हढंच नाही तर ह्याच म्हशीचे ( पुन्हा म्ह - क्षमस्व ), दुध आईच्या दुधाची उणीव भरुन काढू शकते.
( काय मामी ? अनुभव आहे ना ? विसरलात बहुतेक, ईतकि वर्ष झाली . . . .).

ह्याच म्ह्शीच्या शेणाने वर लेपा-लेपी चालली होति ना ?

बरोबर आहे तुम्हा सर्वांचे . . . .जीची आणी ज्याची, आपण सहाय्यता अथवा उपयोग करुन ईथपर्यंत पोहोचलो आयुष्यात, तिचेच नांवही आता आपल्याला " खटकते ", व ज्याने आपल्याला जन्मभर ईथपर्यंत आपल्या ( न मागताही ) कृपेनं आणलं आणी पुढेही तोच पाहिल त्याला आम्ही खूप मजेने विडंबित करु.
आणी वर अभिमानाने म्हणु . . . . जाऊदे.
घनःश्याम हे शिर्षक / नांव पाहुन ( विडंबन वाचलेच नाही ) मंदीर समजुन आलो होतो, विडंबन पाहुन खरोखर वाईट वाटलं, म्हणुन ( क्षमस्व ) राग येउन बोललो, बहुतेक हीच मला प्रेरणा मिळाली असावी ! दोन गोष्टींसाठी . . . .१). विडंबन कारास थोडेसे का होईना पण जागेवर आणण्यासाठी.
२). मला हे दाखविण्यासाठी कि बघ ! दुनिया किती पुढारलेली आहे आणी तू ? अजुनही मला नेहेमी सर्वत्र पाहातोस ? दिसलो का मी तुला ईथे ? आहे का मी ईथे ? अरे वेड्या ! मी सर्वत्र असुनही नाही, पुन्हा एकदा संपूर्ण निर्गुण झालो आहे, माझ्या विडंबनेच्या नुसत्या कल्पनेनं जर
तुला वाईट वाटत असेल तर मला तेव्हढेच पुरे आहे . . . . मी तर फक्त हेच पहात होतो कि तु सुद्धा माझ्या विडंबनेस टाळ्या वाजवतोस कि त्यांत विरोध करतोस !

दाद,
आता मी निघतो, टंकण करता करता समोर आता खूपच अंधुकसं दिसतंय, बोलता बोलता हे पाणी डोळ्यांतुन केव्हांपासुन आणी किती वाहात होतं ह्याची कल्पनाच आली नाही.
पण फक्त माझ्या अंतर्मनातल्या देवाच्या साठी . . . . अभिषेकाचा हा मार्ग.

दाद, १९:०७ ची पोस्ट आवडली. फक्त असं आहे, की तुम्ही मनापासून माफी मागितली तरी हे साहित्य इथेच राहिल अणि ज्यांना दुख झालय त्यांना ते बोचत राहिल येवढच.

परब्रम्ह, तुमच्या भावना समजू शकतात पण इतर कोणी काहीही लिहिलं (दाद नी लिहिलय ते तर तसं सौम्यच म्हणावं लागेल कारण ह्याही पेक्षा हिडिसपणे तुमच्या धार्मिक भावनांची अवहेलना करणारे ही तुम्हाला सहज सापडतील) तरी तुमच्या भावनेला, श्रद्धेला तडा जाणार नाही ह्यातच सगळं आलं. त्यात त्यांनी माफीही मागितली. दाद म्हणतायत तसं "आपला व्यवहार" महत्वाचा.

परब्रम्ह,

मुळ गाणे हे माझेही फेवरेट आहे पण हे विडंबन करण्यामागे कुठलीही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतु असेल असे मुळीच वाटत नाही. इतर कोणी लिहिले असते तर शंका घ्यायला वाव तरी होता..पण हे "दाद" यानी लिहिलेले आहे. त्यांचे आधीचे लिखाण/प्रतिक्रिया आपण वाचलेल्या असल्यास त्यांच्याएवढे संयमशील लिखाण करणारे फार थोडे जण इथे आहेत. आणि त्यांच्याकडुन जाणुनबुजुन असे काही झाले असेल असे वाटत नाही. तुम्ही उगाच त्रास करुन घेताय असे वाटते. (आपण त्यांचे "बाबुल मोरा" वरील ललित वाचले आहे का? एकदा वाचाच!)

Having said that,,
दाद,
मला हे विडंबन मुळीच आवडले नाही. कुछ जम्या नही. वीरु किंवा गेलचा खेळ पाहण्यासाठी जावे आणि त्यांना पहिल्याच बॉलला आउट होताना पहावे असे काही तरी वाटले. स्पष्ट लिहिल्याबद्दल क्षमस्व.

सगळ्यांचे आभार. विडंबन इथेच रहाणार आहे.. विडंबन सुमार असू नये ह्याचं उदाहरण म्हणूनही कदाचित Happy

परब्रम्ह, <<बहुतेक हीच मला प्रेरणा मिळाली असावी ! दोन गोष्टींसाठी . . . .१). विडंबन कारास थोडेसे का होईना पण जागेवर आणण्यासाठी.>>

मला जागेवर आणण्याचा प्रयत्नं? मी कुठेही गेले नव्हते, आधीही नाही.. अजूनही नाही. मी माफी तुमच्यातल्या दुखावल्या गेल्या भोळ्या भक्तीभावाची मागितलीये... अन फक्तं तितकीच. प्लीजच गैरसमज नसावा. विडंबनातला शब्दंही मी बदललेला नाही अन हे विडंबन इथेच रहाणार आहे.

तुम्हाला ज्याने ह्या सोकॉल्ड प्रेरणा दिल्यात त्यानेच मलाही हेच विडंबन लिहिण्याचीही प्रेरणा दिलीये. तुम्हीही तुमच्या त्या विश्वासापासून ढळू नका. मीही कुठे जात नाहीये.

पाडगावकरांच्या ओळींचे आमचेही विडंबनाचे २ पैसे -

मखरातला गणपती हवा असणार्‍यांना सलाम
गणपतीला सलाम करणार्‍यांनाही सलाम
दुखावल्या गेलेल्या भावनांना सलाम
मनात भावना उरलेल्यांना सलाम

परब्रह्म,
दादची मी खुप मोठी पंखी असुनही हे विडंबन मला खुप आवडले नाही पण तुम्ही तिचे इतर साहित्य वाचलेत का? वाचले नसेल तर एकदा वाचाच एव्हढच मी म्हणीन! तिच्या आत्तापर्यंत वाचलेल्या लेखांवरुन तिने हे विडंबन फक्त गंमत म्हणुन केले असावे असे मला वाटते. कुणाच्याही भावना दुखावणे, परदेशात आहे म्हणुन श्रीकृष्णाला (देवाला) विसरणे असा काही तिचा उद्देश नाहीये! तसही तिने तुमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत म्हणुन माफी मागितली आहेच. पुढे चला!

<<विडंबन सुमार असू नये ह्याचं उदाहरण म्हणूनही कदाचित >>
परब्रम्ह यांच्याशी अंशतः सहमत आणि विडंबनकर्तीच्या वरील भुमिकेशी संपुर्ण सहमत.

ए बेंचमार्क फॉर हौ लो यु कॅन गो...

दाद,
हे विडंबन जराही आवडले नाही. जमले सुद्दा नाही. खूपच ओढून ताणून लिहिले आहे. (ते कोणीही लिहिले असते तरी हाच प्रतिसाद असता. )
बाकी, ती भूपाळी मला खूप आवडते.
बर्‍याच चांगल्या गाण्यांची वा कवितांची विडंबने वाचणेच नकोसे वाटते कारण ते आपल्याला फार आवडते.(ह्यात धार्मिक वगैरे सबंध लावू नका) फक्त आवड म्हणूनच घ्या.

>>>बहुतेक हीच मला प्रेरणा मिळाली असावी ! दोन गोष्टींसाठी . . . .१). विडंबन कारास थोडेसे का होईना पण जागेवर आणण्यासाठी.<<<

हाच तो अध्यात्मिक ईगो.

>>>टंकण करता करता समोर आता खूपच अंधुकसं दिसतंय, बोलता बोलता हे पाणी डोळ्यांतुन केव्हांपासुन आणी किती वाहात होतं ह्याची कल्पनाच आली नाही.
पण फक्त माझ्या अंतर्मनातल्या देवाच्या साठी . . . . अभिषेकाचा हा मार्ग<<<

हे येथे सांगावे लागणे हा दंभ!

Pages