दैव देते अन् कर्म नेते

Submitted by यःकश्चित on 18 April, 2013 - 12:58

दैव देते अन् कर्म नेते
========================

दैव देते अन् कर्म नेते
का बरे तू स्वप्नात येते,
मनातला हा बांध भावनांचा
फोडून पुन्हा का उगाच छळते ?

घालूनही सक्त ताकीद मनाला
तुला विसरणे जमेना मला,
मिटता डोळे दिसे मला तू
येतो आठव वेड्या दिला....

दूर असूनही गंध न विरला
मनमोहक तो गुलाब दिसला,
मोहून त्यासी खुडू पाहता,
काटा मनीचा मनात घुसला....!

Group content visibility: 
Public - accessible to all site users