भुलैया

Submitted by अज्ञात on 18 April, 2013 - 09:13

मन धावे....... मन धावे......
पालवी नवी अंगावरती ओलावे...
ओठात नवे जीवनगाणे..
वाटे गावे...
मन धावे...

मोकळ्या दिशा
आकाश कडेवरती,.. वाकुन बोलावे
ओणवे मेघ मल्हार कधी
अमृत घन पान्हावे...
साकेत अंगणी पुष्करिणीसह
दान पसा पावे...
मन धावे...

साधार कल्पना
स्वप्न अकल्पित दावे...
जे काय हवे ते
हृदयी भावे.....
संकेत संगमी,
रंजन संगर भुलवे...
मन धावे...... मन धावे.....

.....................अज्ञात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा. छान आहे चित्रमालिका, गुणगुणता येतेय.
नवी पालवी, मेघमल्हार, स्वप्नमालिका .. मनाचं धावणं छान आलंय.

अज्ञाता कडे जाता जाता
ज्ञात झाले
मन धावे ...मन धावे
.......सांगावेसे वाटे ..कविता आवडली