लग्न करणाऱ्या मित्रास ,

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 16 April, 2013 - 10:35

लग्न करून माणसं सुखी
होतात की नाही
हे मला अजूनही नीट
कळलेले नाही
तरीसुद्धा तुझे वैवाहिक जीवन
सुखी होवो
ही शुभेच्छा दयायला
काहीच हरकत नाही
परीक्षेत हमखास नापास होणा-या
विद्यार्थांस ही आपण आँल द बेस्ट
देतोच की नाही
पण खर सांगु मित्रा
मला मनापासून वाटत
दुनिया पाहिल्यावर स्पष्ट दिसत
आपल्या जीवनसाथीदाराला जे
बायको करून टाकतात
ते आपल्या जीवनात
सायको होऊन जातात
तिच्या त्याच्या व्यवहारात
कायदेकानू तयार होतात
प्रेमपंख गळून पडतात
तिने असेच वागले पाहिजे
असेच त्याला वाटते
तिचेही काहीसे तसेच असते
कधी कधी कुणी
आपले मन मारून टाकते
आहे तसे त्यात जुळत घेत राहते
कुणा कुणाच कधी
पार फाटत फाटत जाते
पण मिळत जुळत घेणे
वा काडीमोड करणे
यात जीवन हरवून जाते
नाही म्हणजे लग्न झाल्यावर
बरच काही बदलत असते
नवे जग, नवे व्यवहार
हे सारे अपेक्षित असते
नव्या बागेत रोपही
कसे वेगळे वाढू लागते
वेगळी वळण नव्या फांद्या
नवे रूप फुलू लागते
परंतु माझ म्हणण वेगळे आहे
जीवनाच्या गाभ्याशीच
त्याचे खोल नाते आहे
सहजीवनाच सूत्र त्यात
निखळ प्रेम व्यक्त आहे
प्रेम प्रीती शब्द फार वरवरचे आहेत
अनर्थाचे त्यावरती बरेच छाप आहेत
हक्क अहंकार अपेक्षा नसते
तेव्हा जी कृती घडते
नात्यात व संबंधात उतरते
तेव्हाच प्रीती घडत असते
तेच जीवन जगणे असते
अशीच प्रीती तुमच्यात घडो
बंधन नको बंध जडो
मैत्री व प्रीती उलगडो
हि शुभेच्छा आता देतो
थोडे कळले जे ते सांगतो

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खर तर हि कविता ,थोडी विनोदी,,थोडी सिरिअस आहे ,पण प्रेमाचा विचार त्यात प्रामुख्याने आल्यामुळे इथे टाकली आहे .

कधी कधी कवितेच्या form साठी अडून बसल्यावर कवितेची वाट लागते .मी अष्टपदी साठी कवितेची अशीच वाट लावली होती .पण आता मूळ कविता टाकतो आहे . मलाच बर वाटतय .