''तुझा बोलवीता धनी कोण आहे ''?

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 16 April, 2013 - 09:17

तुझ्या कुंडलीतिल शनी कोण आहे
तुझा बोलवीता धनी कोण आहे

तुझ्या जीवनाची तुझी शिल्पकारी
तरी बोललो प्राक्तनी कोण आहे

गृहस्थाचिया प्रश्न बंदीगृहाला
खुला कोण अन बंधनी कोण आहे

सुखाच्या सवे ढोल-ताशे,वराती
मुक्या वेदनेचा ध्वनी कोण आहे

नसे शुष्क ''कैलास''ची जिंदगानी
तुझ्या ओलसर लोचनी कोण आहे?

--डॉ.कैलास गायकवाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह डॉक !!

मस्त गझल !!

गृहस्थाचिया प्रश्न बंदीगृहाला
खुला कोण अन बंधनी कोण आहे

>>> मस्तच !!

तिलकधारी आला आहे.

सुखाच्या सवे ढोल-ताशे,वराती
मुक्या वेदनेचा ध्वनी कोण आहे

नसे शुष्क ''कैलास''ची जिंदगानी
तुझ्या ओलसर लोचनी कोण आहे?

चांगले शेर आहेत.

तिलकधारी निघत आहे.

आवडले सगळे शेर
पण << तरी बोललो>>> इतका भाग व त्याचे नेमके प्रयोजन लक्षात नाही आले

सुखाच्या सवे ढोल-ताशे,वराती
मुक्या वेदनेचा ध्वनी कोण आहे>>>सर्वात जास्त आवडला

तुझ्या कुंडलीतिल शनी कोण आहे
तुझा बोलवीता धनी कोण आहे<<<<<<कानाला खटकले, कुंडलीचा केले तर चालावे!......विधानात्मक शेर वाटला.

तुझ्या जीवनाची तुझी शिल्पकारी
तरी बोललो प्राक्तनी कोण आहे<<<<<बोलतो हवे आहे काय? दोन्ही मिसरे एकाच व्यक्तीस उद्देशून असतील तर!
गृहस्थाचिया प्रश्न बंदीगृहाला
खुला कोण अन बंधनी कोण आहे<<<<<<वृत्तशरणता जाणवली!

सुखाच्या सवे ढोल-ताशे,वराती
मुक्या वेदनेचा ध्वनी कोण आहे........शेर आवडला.......तुलनेने निर्दोष!

सर्व वै.मते!

तिलकधारी परत आला आहे.

कर्दनकाळाशी बर्‍यापैकी सहमत आहे.

तिलकधारी निघत आहे.

मक्ता मस्तच.

मुक्या वेदनेचा ध्वनी कोण आहे
तुझा बोलवीता धनी कोण आहे

असा मतला करून वाचला, मजा आली.

छान गझल काका Happy

<<<सुखाच्या सवे ढोल-ताशे,वराती
मुक्या वेदनेचा ध्वनी कोण आहे>>> व्वाह! हा शेरच जास्त आवडला Happy

सुखाच्या सवे ढोल-ताशे,वराती
मुक्या वेदनेचा ध्वनी कोण आहे >>> हा सर्वात आवडला.

सुखाच्या सवे ढोल-ताशे,वराती
मुक्या वेदनेचा ध्वनी कोण आहे...........मस्तच !!