दुष्काळ

Submitted by विशाल कुलकर्णी on 24 October, 2008 - 02:06

अधीर आर्त स्वरांनी
पुसते धरा नभाला
तो गंध तुझ्या स्मृतींचा
सख्या कुठे निमाला...

प्रीतीत रंगलेला
कणा-कणात रुजलेला
अपुल्या मधु-मिलनाचा
मृदगंध कुठे हरवला...

आठवते अजुनी
भेट तुझी सौख्याची
त्या भेटीत गुंफलेला
स्नेहबंध कुठे गळाला...

स्खलित जाहले
पतिव्रता जरी मी
मनात गुंतलेला तो
स्पर्ष कुठे निमाला...

व्याकुळ धरणी वरुणासाठी
कृषक, पुत्र तिचा तोही पुसतसे
वरदहस्त प्रभो,
तव तो कुठे हरवला...

विशाल, २४/१०/२००८

गुलमोहर: