घेउया अंगावरी पावसाच्या सरी

Submitted by मउ on 16 April, 2013 - 01:32

धुंध ही हवा, हवेमध्ये हवाहवासा गारवा,
या पहिल्या पावसात चिंब भिजण्यासाठी
वाट पाहतेय तुझी सखी
ये ना..... ये सत्वरी आणि
घेउया अंगावरी पावसाच्या सरी

त्याच रस्त्याच्या वळणावर,
आजही आहे उभी तुझी सखी
हाती धरुन एक छोटीशी छ्त्री
छत्री फक्त नावालाच कारण
तुझ्या सवेत भिजताना पाहु नये कोणी
पण तू येशील ना?
ये ना..... ये सत्वरी आणि
घेउया अंगावरी पावसाच्या सरी

दिवस गेले महिने गेले,
रात्र ही आता संपत आली
वाट पाहुनी नेत्र थकले
गात्रे ही सर्व शिथील झाली
तरीही तिन्ही सांजेला वळ्णावरती,
वाट पाहतेय सख्या तुझी सखी
ये ना..... ये सत्वरी आणि
घेउया अंगावरी पावसाच्या सरी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर... तरल...

त्याच रस्त्याच्या वळणावर,
आजही आहे उभी तुझी सखी
हाती धरुन एक छोटीशी छ्त्री
छत्री फक्त नावालाच कारण
तुझ्या सवेत भिजताना पाहु नये कोणी
पण तू येशील ना? >>>>>>> खुप आवडल