भाप्पा दोई - बंगाली गोड पदार्थ - फोटोसह

Submitted by दिनेश. on 15 April, 2013 - 05:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
हॉकिन्स कूक बूक आणि रुचिरा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, हे मिष्टी दोईचेच व्हर्जन आहे का? मला मिष्टी दोई प्रचंड आवडतं. ही खुप सोप्पी आणि मस्त क्रुती वाटतेय. नक्की करणार!

१ टिन कंडेन्स्ड मिल्क
२) १ कप घट्ट दही, थोडे आंबट हवे
३) १ टिन इव्हॅपोरेटेड मिल्क

यामध्ये पावाच्या स्लाईसेस कश्यात भिजवायच्या?

येस्स. मी केलंय हे भापा दोई एकदा. मस्तच लागतं. मी (बहुधा) उषा पुरोहितांच्या पुस्तकात वाचून केलं होतं. ती पद्धत खूपच सोपी होती (म्हणून तर मी केलं Happy ).

यम्मी!!
मस्त दिसतय भाप्पा दोई Happy
एका बाम्गलादेशी मैत्रिणीने दिलेल्या कृतीने एकदा केले होते...
भाप्पा = भाप = वाफ, वाफेवर शिजवलेले म्हणून भाप्पा दोई - असे तिने सांगितले.
याचे एक बेक्ड वर्जन पण असते त्याला काय म्हणतात?

अविगा, इव्हॅपोरेटॅड किंवा साधे आटीव दूध वापरले तर त्यात भिजवायच्या.

लाजो, हाच प्रकार बेक करतात म्हणजे आपण कष्टर्ड बेक करतो तसे, पाण्याच्या ट्रे मधे. नाव हेच बहुतेक Happy
मामी, ती पण रेसिपी बघायला हवी. घरी असणार पुस्तक.

प्रचंड आवडते हे खायला. एका बंगाली मित्राने खजूराचा गूळ घालून केलेले भाप्पा दोई आणले होते. ते तर अप्रतिमच होते. पण मुंबईत कुठून मिळणार खजूराचा गूळ?

दिनेश, मिष्टी दोई ची कृती पण द्या माहीत असल्यास.

माधव, चेंबूरला डायमंड गार्डनसमोर बंगाली पदार्थ मिळायचे दुकान आहे, त्यांच्याकडे मिष्टी दोई मिळते.
कृती म्हणजे तिच, बासुंदीला विरजण लावायची.

दक्षे, याला कुठे पुर्वतयारी लागतेय, तो मिल्कमेडचा टीन आणला कि झाले !

दिनेशदा तुम्हाला मनापासुन धन्यवाद. एकापेक्शा एक सरस आणी शुअरशॉट रेसिपी असतात तुमच्या. हे देखिल करुन बघणार. मिष्टी दोई खुपच आवडतं त्यामुळे हेपण आवडेल बहुतेक.

माधव - खजुराच्या गुळाबद्द्ल अगदी अगदी. त्यात केलेली नुसती खीरसुद्धा एवढि सुंदर लागते की ज्याचं नाव ते. कुणी थंडीत कोलकत्याला गेलं तर यंदा मागवुन घ्यायचा विचार आहे.

मस्त रेसिपी! आजच करुन बघते. पावाची आयडिया आवडली. काचेच्या बाउलमध्येच करायला पाहिजे का? दुसरा मार्ग काय आहे?

भाप्प्या दहीत खजूराचा'च' गूळ छान लागतो.(इती श. पक्ष) दुसरा गूळ वा साकह्र घातले की पचपचीत होते. म्हणून ब्रेड घालायला सांगितला असेल.

हो अनया, तो चालेल. ( हॉकिन्स कूक बूक मधे मात्र मोल्ड सांगितला आहे. )

जयश्री, घटक वेगळे आहेत का ?
मलापण करुन बघता येईल !

मुक्तेश्वर, पाव साधा, स्लाइस ब्रेड.

फोटो एकदम भारी आहे.
थोडक्यात याला डबल बॉयलर पद्धत वापरून वाफवायचे आहे तर.
सेट झालेले दोइ खरवसाच्या consistency चे असते का?

Pages