फोटो हवे आहेत.

Submitted by नंदिनी on 14 April, 2013 - 23:21

मला काही कामानिमित्त गणपतीला पूजेसाठी वापरण्यात येणार्‍या पत्रीचे फोटो हवे आहेत. एकूण २१ फोटो हवे आहेत. फोटोवरती कुठलाही वॉटरमार्क नको. पुस्तकामधे वापरण्यासाठी जर हे फोटो सीलेक्ट झाले (सिलेक्शन माझ्याहाती नाही हे आधीच स्पष्ट करते) तर पुस्तकामधे फोटोग्राफरच्या नावाचा उल्लेख अवश्य केला जाईल. फोटो स्वतः काढलेले अथवा ज्याने काढले आहेत त्याच्या लिखित परवानगीनेच द्यावेत ही विनंती. फोटो पुस्तकामधे वापरण्यासाठी असल्याने उत्तम रेझोल्युशनचे असायला हवेत. फोटोसाठी आर्थिक मोबदल्याबद्दल अजून मला नक्की काहीच सांगण्यात आले नाही. जसे मला समजेल तसे मी इथे लिहेन.

खालील पत्रींचे फोटो हवे आहेत.

दूर्वा
माका
बेल
बोर
धोतरा
तुळस
मधुमालती
शमी
विष्णूकांता
आघाडा
डोरली
कण्हेर
रूई
अर्जुन सादडा
डाळिंब
देवदार
मरूआ
पिंपळ
केवडा
जाई
अगस्ती

तरी मायबोलीवरच्या ज्या फोटोग्राफरना यामधे इंटरेस्ट असेल त्यांनी कृपया मला संपर्कामधून एक मेल पाठवावे ही विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दूर्वा, बेल, धोतरा, तुळस, मधुमालती, शमी, आघाडा, कण्हेर, रूई, डाळिंब, पिंपळ, केवडा, जाई याचे फोटो मी काढुन देऊ शकेन. कधी हवे आहेत. माझ्याकडे एकही नाहीये.

माझ्याकडे, तुळस, पिंपळ, मरूआ (म्हणजेच "मरवा" का?), कण्हेर, मधुमालती, शमी, रूई, बेल, बोर, डाळिंब हे फोटो आहेत. Happy

अनिष्का, वरील फोटो तू स्वतः काढले आहेस का? मला नेटवरचे फोटो नको हवे आहेत.

जिप्सी, मेल करशील का फोटो? जागू आणि केपी, जितक्या लवकर पाठवशील तितक्या लवकर उत्तम होईल.

जिप्सी, कधी मेल करतोयस फोटो?

तुझे फोटो आले की मग राहिलेले केपीला क्लिक करायला सांगेन. त्यातून राहिले की मग जागूला सांगेन. Happy त्यातूनही काही राहिले तर मग दिनेशदांना साकडे घालता येईल..