प्रार्थना

Submitted by समीर चव्हाण on 14 April, 2013 - 14:43

संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांचे धन्यवाद.

सतीशजी विपुतून मत दिले तर आवडेल.
मी उत्तर द्यायचा प्रयत्न करीन.

वैभवः शक्य आहे. कधी-कधी मला माझेच कळत नाही.

>>
तळ पाहिला ख-याचा कोणीतरी खरोखर
केव्हातरी दिसावा ही एक आस राहो

ही प्रार्थना न राहो होऊन एक मंशा
शुद्धी जळास लाभो, घट हा उदास राहो
<<

वा! Happy

सुंदर, समीर. सगळेच शेर आवडलेत. (मंशा म्हणजे काय? त्या शेराचा अर्थं त्यामुळे काठाकाठाने लागतोय. जो काही लागतोय तो बेहद्द सुरेख आहे)

मंशा इच्छा/निश्चय ह्या अर्थाने घेता येईल.
ह्या शब्दाला अर्थाचे इतरही पदर आहेत.
धन्यवाद.

ओह... हा शब्दं मी कोल्हापूरकडे ऐकलाय पण तो "मनिषा" ह्याचा अपभ्रंश म्हणून.

तळ पाहिला ख-याचा कोणीतरी खरोखर
केव्हातरी दिसावा ही एक आस राहो...............सुरेख !!

गझल आवडली.

ही प्रार्थना न राहो होऊन एक मंशा
शुद्धी जळास लाभो, घट हा उदास राहो>> व्वाव्वा!

तिलकधारी आला आहे.

किमान काही शेर पोहचत आहेत हे पाहून बरे वाटले.

अल्पसंतुष्ट आहेस असे दिसते. प्रत्येक ओळ पोचली. एकही शेर पोचला नाही.

तिलकधारी निघत आहे.

अल्पसंतुष्ट आहेस असे दिसते.
अजिबात नाही. बरे वाटले हे मी पहिल्या काही प्रतिसादांकडे पाहून म्हटले होते.
खरेतर पूर्ण संतुष्ट झाल्याशिवाय गझल पोस्ट करण्याचा मोह मी टाळतो.

प्रत्येक ओळ पोचली.
धन्यवाद.

एकही शेर पोचला नाही.
शक्य आहे. शेर पोहचत असावे हा अंदाज मी नंतरच्या काही प्रतिसादावरून बांधला होता.
मला वाटतं प्रतिसाद हे मार्गदर्शक असतात, जर नीट वाचता आले तर.

बाकी, आपली एंट्री-एक्झिटची शैली आवडली.

सगळ्यांचेच धन्यवाद.

समीर चव्हाण

समास ( हा प्रकारच लुप्त होतोय) या शब्दाचा वापर बेमालूम केलाय. आनंदाचा समास ही कवीकल्पना तुमच्या प्रतिभेची साक्ष आहे.

सय हा शेर आवडला. तळ देखील आवडला.

प्रार्थना हा भाव पोहोचला. घट म्हणजे देह आणि जळ म्हणजे त्यातला शुद्ध आत्मा. छानच. पण घट उदास का ?

प्रार्थना हा भाव पोहोचला. घट म्हणजे देह आणि जळ म्हणजे त्यातला शुद्ध आत्मा. छानच. पण घट उदास का ? >>> मला जास्त काही कळत नाही. पण मला लागलेला अर्थ असा ------
शुद्धी जळास लाभो, घट हा उदास राहो साधारणत : शुद्धीकरणासाठी तावून सुलाखून निघणे ही प्रक्रिया गृहित धरली जाते. जळाच्या बाबतीत उष्णतेने बाष्पीभवन प्रक्रिया होऊन शुद्ध जळ वेगळे होते आणि बाष्पाच्या रुपाने वर जाते. इथेही उष्णता आहेच. ही उष्णता प्रारब्ध भोग भोगण्याचे ताप असू शकतात किंवा वेगळ्या अर्थाने तपाचरण असू शकते. दोन्हीमध्ये शुद्धी आहेच. ज्या घटामध्ये (देहामध्ये) हे जळ साठलेले आहे ते शुद्ध होऊन, तरल होऊन ऊर्ध्व दिशेने (भगवंताच्या दिशेने) जाते आणि घट रिकामा उरते. त्यात उरलीच तर अशुद्धी मागे राहाते. म्हणून जळास शुद्धी लाभो आणि घट जळाविना उदास राहो.

बाकी अजूनही अर्थ निघत असतीलच Happy

घट हा उदास राहो >>> मलाही हेच समजले नव्हते म्हणून काही बोलणे टाळले
अश्विनी जी तुमचा प्रतिसाद उत्तम आहे

पण तरीही घट उदास का राहो हे समजतच नाहीये

अश्विनीजी:

आपल्या विचारांसाठी धन्यवाद.
आपला अर्थ मी असा घेतला: देह उदास म्हणजे आत्माहीन व्हावा, जो उदास ह्या शब्दाच्या dispirited ह्या अर्थाशी येऊन मिळतो.

विस्मयाजी: उदास/उदासी ह्या शब्दाच्या अर्थाच्या अनेक छटा आहेत: उदा. void of affection or inclination towards, inert

http://dsal.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%89%E0%A4%A6%E0...

लिहिताना अपेक्षित अर्थ असा काहीसा होता: आत्म्याला वा मनाला शुद्धी लाभावी तर देह ऐहिक बंधनातून मुक्त रहावा. दु:खाचे मूळ हे अशी बंधनेच असतात.
मांडणी नवीन असली तरी हा विचार काहीसा पारंपारिकच आहे.
ब-याचदा अर्थ नेमका शब्दात मांडता येत नाही. मला वाटतं मांडायचा आग्रहही नसावा.
मजरूह म्हटल्याप्रमाणे अर्थाची दिशा सांगता यावी, अर्थ नाही.

पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद.

अ‍ॅक्चुअली, घट उदासीन (अलिप्त) राहो असे हवे वरचा अर्थ घेतला तर. उदास म्हणजे खिन्न. उदासीन म्हणजे न्युट्रल.

छान

अश्विनी, 'जोडोनिया धन | उत्तम वेव्हारे | उदास विचारे | वेच करी ||' आठव. Happy
(याचा अर्थ 'खर्च करताना उदास/हताश हो असा नाही ना? :P)

मला त्या 'उदास'वर श्लेषही साधला जातो आहे असं वाटलं. (उद = पाणी, उदास = पाण्यासाठी).
आतला 'कन्टेन्ट' महत्त्वाचा आहे आणि घटाचं (देहाचं) महत्त्व हे केवळ तो कन्टेन्ट धारण करण्यापुरतं आहे हे कळून येवो.

Pages