काल माझ्या दाराशी देव उभा होता

Submitted by उद्दाम हसेन on 13 April, 2013 - 23:57

काल माझ्या दाराशी देव उभा होता
म्हणाला तिचा पत्ता आज इथला होता
गोंधळून म्हणालो ये, आत ये देवा
स्वप्नात देखील तिचा रस्ता इथला नव्हता
वाट चुकलास कि मग चुकलास चुकून
नास्तिकाच्या घरी तर देवही ठरतो खोटा
घाम पुसत तेव्हां देव सांगता झाला
माझाच माझ्यावर विश्वास उरला नव्हता
भक्तांनी लुटण्याचा धक्का बसला होता
तिच्या पत्त्याचा तर हा बहाणाच होता
नास्तिका रे तुझा हा खांदा उरला होता

मी ही हसलो, सोनचाफा घेऊन आलो
तिच्या श्रद्धेचा, जो अमर, परिमळ होता..

Kiran...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घाम पुसत तेव्हां देव सांगता झाला
माझाच माझ्यावर विश्वास उरला नव्हता
भक्तांनी लुटण्याचा धक्का बसला होता

हे आवडलं.

भक्तांनी लुटण्याचा धक्का बसला होता
तिच्या पत्त्याचा तर हा बहाणाच होता
नास्तिका रे तुझा हा खांदा उरला होता

आवड्ली.
संदीप खरेंची 'नास्तिक' आठवली..