काचभर तडा....

Submitted by सत्यजित on 13 April, 2013 - 14:07

काल पुस्तकांच्या कपाटातून
जुन्या पत्रांचा गठ्ठा पडला
काचेच्या तुकड्यां सारखी
विखुरली सारी पत्र
पण आवाज न करता...

कितीही सांभाळुन
वेचायच्या म्हंटल तरी
घुसतातच काही काचा
आणि ठुसठूसत रहातात बराच वेळ

वेदना सरावाच्या झाल्या की
मी पुन्हा त्या पत्रांचा गठ्ठा बांधतो
आणि जपून ठेवतो...

तडा गेलेल्या भांड्यालाही
फुटायच भय असतंच की

-सत्यजित.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेदना सरावाच्या झाल्या की
मी पुन्हा त्या पत्रांचा गठ्ठा बांधतो
आणि जपून ठेवतो...

तडा गेलेल्या भांड्यालाही
फुटायच भय असतंच की

ह्म्म्म्म्म खरंय ..............!! Happy

तडा गेलेल्या भांड्यालाही
फुटायच भय असतंच की

व्वा.

ठसठसत आणि ठुसठूसत दोन्ही शब्द वापरातले आहेत. पण मला असं वाटलं मनातला राग ठसठसत रहातो आणि काटा काच ठुसठुसते.. नक्की माहीत नाही..

आरती ताई आभार..

वर्षा तुझी दाद नाही आली तर कविता फसली हे नक्की, खुप आभार.

तडा गेलेल्या भांड्यालाही
फुटायच भय असतंच की................. क्या बात है !!