उडत्या तबकड्या......परग्रहावरचे पाहुणे...गूढ अवकाशातील गूढ गोष्टी.....सत्य??.....असत्य??.....भास? आणि अनुभव

Submitted by नाना फडणवीस on 12 April, 2013 - 08:49

माझ्या मायबाप देवान्नू......थोडक्यात माबोकरान्नो......एक विचार आला...कि जर भूत खेतांसारख्या गोष्टी एवढ्या चर्चल्या जाऊ शकतात....no offense.....म्हणजे सूज्ञ जनतेत ही या सारख्या गोष्टीत स्वारस्य तर नक्कीच आहे.......चूक वा बरोबर हा मुद्दा बिल्कुल चर्चेचा नाहि...इथे तरी.....मुद्दा आहे...जर आपल्या कडे माहिती आहे....तर ती आपण नक्किच share करू शकतो...अजून एक मुद्दा....UFO..फक्त US, Russia...सारख्या प्रगत देशातच दिसतात या बद्दल मला नक्कीच आक्शेप आहे......आपण भारतवासिय असेही काही अप्रगत नाही कि कोणी (म्हणजे....कोणी परग्रहवासियान्नी) दखल घेतली नसेल......जर त्या तिथे दिसतात तर शक्यता दाट आहे की त्यांचा आपल्यातल्या लोकान्नीही काहितरी अनुभव नक्कीच घेतला असेल्.....आणि शेवटी त्या कुठेही दिसू देत्...पण चर्चा व माहितीची देवाण घेवाण नक्कीच होउ शकते.....बघुयात काय समोर येतय ते... !! (मायबापान्नू सुद्लेक्नाचच्या चुका काडू नका.... Happy )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुणे मध्यवर्ती शहर असल्याने नेहमी येणा-या पाहुण्यांनीच इतका उत आणलाय कि आणखी हे कोण नवीन म्हणून धस्सच झालं काळजात.

Kiran..... Happy खरच जर "हे" पुण्यात आले तर पुणेकर यांना पुणेरी बनवून टाकतील्.....पाट्या लावतील्....आम्च्या गेट समोर यान उभे केल्यास त्याच्या चाकातील हवा सोडण्यात यील..... Happy

खरच जर "हे" पुण्यात आले तर पुणेकर यांना पुणेरी बनवून टाकतील्.....पाट्या लावतील्....आम्च्या गेट समोर यान उभे केल्यास त्याच्या चाकातील हवा सोडण्यात यील..... +१११

वै कु....कुणी निन्दा कुणी वन्दा.....बॉस नसताना TP करणे आमचा धन्दा!! Happy ....लै भारी ....माझ्यातली प्रतिभा माबोकरान्च्या सहवासाने...लै म्हन्जे लै उड्या मारून राय्लीये... Happy

इथे स्कूटर, रिक्षा, बस, टेंपो, ट्रक, मोटरसायकल, सायकल, ट्रॅक्टर, बैलगाडी, विमान, अवकाशयान इ. सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास बंदी आहे.

अशी पाटी दिसेल Wink

वै कु....कुणी निन्दा कुणी वन्दा.....बॉस नसताना TP करणे आमचा धन्दा!! ....लै भारी ....माझ्यातली प्रतिभा माबोकरान्च्या सहवासाने...लै म्हन्जे लै उड्या मारून राय्लीये...

अहो तुम्हाला बॉसची काळजी, मला तर बॉसच नाही, वेळच वेळ
माझे तर लिहिणे गेली १३ वर्षे चालू आहे. प्रतिभा का काय म्हणतात ते कळत नाही. पण टाळक्यात विचार येतात नि कीबोर्ड गरजेपुरता वापरता येतो. मग काय, धम्माल नि काय!

बाकी मला कधी UFO वगैरे काही दिसले तर नक्की सांगीन. आजकाल दारू पिणे फार म्हणजे फारच कमी झाले आहे, त्यामुळे शक्यता कमीच. पण बघू.
Light 1 Happy

लै म्हन्जे लै उड्या मारून राय्लीये...>>>>>>>

Lol

जास्त उड्या मारू नकात नाना कुणालातरी तबकडी वाटायची आणि इथेच प्रतिसादही यायचा की आज आम्ही एलियन पाहिला म्हणून
Wink

झक्की >>>विकान्त आहे. ...होउ द्या little little Happy .......मग दिसतील तबकड्या.....

वै कु....मला उड्या न मारताही काही लोक Alien समजतात Sad ....असो..... Happy

History channel
Mon-fri 10:30 pm
Ancient Aliens

नावाचा प्रोग्रॅम असतो या विषयावर.

माधवी. | 12 April, 2013 - 22:01 नवीन
History channel
Mon-fri 10:30 pm
Ancient Aliens

नावाचा प्रोग्रॅम असतो या विषयावर<<< हा कार्यक्रम मी रोज न चुकता पाहतो, फार माहितीपुर्ण आहे, माझ्य पुष्कळ धारणा क्ल्यिअर झालेत.

आमच्या घरात ग्रामोफोनची तबकडी होती, ती लहान भावाने गंमतीने हवेत फेकली होती .तेव्हाच मला उडत्या तबकडीचा पहीला आणि शेवटचा अनुभव आला होता...:-P
असो ,मला एक असाच जबराट अनुभव आला होता ,पण तो इथे लिहणे संयुक्तीक ठरणार नाही.तुर्तास धन्यवाद.

" पृथ्वीवर माणूस उपराच " ह्या पुस्तकातले बरेचसे मटेरिअल (९९%) erich von daniken च्या पुस्तकातुन उचलल्या सारखे वाटते (फोटोसहित). त्या पेक्शा इन्ग्रजि वाचनाचि आवड असेल तर erich von daniken ची पुस्तके वाचा. एकुण १७ पुस्तके आहेत त्याची ह्या विषयावर .... आपल्या स्रूष्टिजिवनाकडे एका वेगळ्या द्रुष्टिकोनाने बघता येइल. (मी २ वाचली आहेत)
बादवे ... लै भारी विषय आहे हा !!

मला असे वाटते कि, ह्या यु-एफ्-ओ'ज जिथे - जिथे आजपर्यन्त दिसल्या आहेत, तिथे बहुतेक जवळ पास काहिना काहितरी, घडामोडी ( नैसर्गिक ) झाल्या आहेत. उदा: जपान मध्ये त्सुनामी येण्याआधी, एक यु-एफ्-ओ ( अगदी जपानवर नाहि, पण आस पास च्या प्रदेशान्वर ) दिसल्याची बातमी आलि होती.

अरे लोक्स या बीबीवर तुमचे अनुभव अपेक्षीत आहेत
जसे अमानवियवर तुम्हाला किंवा तुमच्याशी रिलेटेड कोणाला तरी आलेले अनुभव लिहिलेत तसे इथे तुम्हाला आलेले परग्रहवासियांचे अनुभव हवे आहेत...
म्हणजे तुम्ही पाहीलेल्या उडत्या तबकड्या वगैरे वगैरे

मला किंवा माझ्याशी रिलेटेड कोणालाच असे काही अनुभव नाहीत. Sad
आमच्याकडे भूताचे वगैरेही कोणाला अनुभव नाहीत.
मलाही असे अनुभव वाचायला आवडतील.

Pages