जुनी कविता - बेभान जग बेभान

Submitted by बेफ़िकीर on 10 April, 2013 - 01:50

'आलास तू उशिरा' या माझ्या प्रथम काव्यसंग्रहातील ही एक जुनी रचना येथे देत आहे.

=============================

बेभान जग बेभान
बेभान जग बेभान

करू नको टीकेची चिंता, करू नको तत्वांचा गुंता
मानवनिर्मित या भगवंतामध्ये नसते जान

बेभान जग बेभान
बेभान जग बेभान

असले येथे लाख तरीही, भिन्न भिन्न सर्वांच्या वाटा
या वाटेवर तूच एकटा, वाट तुझी सुनसान

बेभान जग बेभान
बेभान जग बेभान

लाट किनार्‍यावर आदळते, वाग तिचे तू घेउन बळ ते
पहा कशी मग दुनिया पळते, सैरावैरा छान

बेभान जग बेभान
बेभान जग बेभान

रुढी प्रथा नी रीतीभाती, असती सार्‍या दुसर्‍यांसाठी
मानु नको त्या, फक्त स्वतःच्या मनमानीला मान

बेभान जग बेभान
बेभान जग बेभान

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users