*** आठवांचे तळे तरल झाले

Submitted by अरविंद चौधरी on 9 April, 2013 - 12:22

*
आठवांचे तळे तरल झाले
आज डोळे पुन्हा सजल झाले

टाकल्या सोंगट्या शिताफीने,
डाव सारे तिचे सफल झाले

खूप केली कमाल स्वप्नांनी,
मन स्मृतींनी पुन्हा विकल झाले

आणला मंद गंध वाऱ्याने,
शब्द गंधाळले,गझल झाले

भाग्य हे काळवंडले होते,
चंद्र आला तसे,धवल झाले

---- अरविंद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणला मंद गंध वाऱ्याने,
शब्द गंधाळले,गझल झाले

भाग्यही काळवंडले होते,
चंद्र आला तसे,धवल झाले

<<< मस्तच शेर

'भाग्य हे' असे एकदा नुसते वाचून पाहिले. Happy

मला खूप खूप आवडली ही गझल अरविंदजी

पण एक जिज्ञासा....

गालगागा लगा गालगागा..... की .....गालगागा लगा लगागागा ? या पैकी नक्की कोण्त्या लयीत वाचायची आहे ? की केवळ एक मात्रावृत्तासारखी वाचायची आहे ??
मी<<<<खूप केली कमाल स्वप्नांनी,>> इथे अडखळलो म्हणून विचारले ....गै न
(वृत्ताचे नावगाव कळाले तर अधिकच उत्तम )

मनापासून धन्यवाद...

@ वैभवराव----
वृत्त -लज्जिता
----गालगा गालगा लगागागा

खूप खूप धन्यवाद डॉ.साहेब व अरविंदजी

मला आता नवीनच प्रश्न पडलाय की....
ही यतिस्थाने नक्की कशी ठरवायची / ठरतात ?
......कारण मी लिहिलेली , डॉ. साहेबांनी लिहिलीली व अरविंदजींनी लिहिलेली लगावली सेम असली तरी वेगवेगळ्या जागी ती तोडली आहे

गालगागा लगा लगागागा >>>>इति मी

गालगागा लगा लगा गागा>>> इति डॉ साहेब

गालगा गालगा लगागागा>>>> इति अरविंदजी

या वृत्ताच्या यतीला महत्व देऊ नये. लगावली अरविंदरावांनी लिहिली आहे तशीच सहसा मानली जाते. चर्चा वाचूनच मी माझी 'पानगळ चक्क वाजवी होती' ही गझल मुद्दाम वर आणली.

चर्चा वाचूनच मी माझी 'पानगळ चक्क वाजवी होती' ही गझल मुद्दाम वर आणली.>>>>
माझ्या त्वरित लक्षात आलंच होतं ते
धन्स

"टाकल्या सोंगट्या शिताफीने,
डाव सारे तिचे सफल झाले

आणला मंद गंध वाऱ्याने,
शब्द गंधाळले,गझल झाले "

छान...

सुन्दर

मतला छान आहे.
गझल झाले पण चांगला आहे.
राधिका राधिका यमाचा गा.. असं म्हणतात या वृत्ताला ( साधारणत: असंच वाचलं जातं हे वृत्त)

उत्तरे सापडायची पुर्वी
माणसे उलगडायची पुर्वी

ही पण याच वृत्तातली चांगली गझल आहे