विणकामाचे काही नवीन पॅटर्न्स

Submitted by अवल on 8 April, 2013 - 01:10

नुकतेच काही नवीन विणले त्याचे हे फोटो

हा दोन सुयांवरचा, योक पद्धतीने केलेला जाळीच्या डिझाईनचा स्वेटर , टोपी आणि मोजे

IMG_5158 copy.jpg

हा मी तयार केलेला एक नवाच पॅटर्न. ब-याचदा बाळाला गुंडाळून घेतल्यावर शाल एकीकडे अन बाळ एकीकडे असे होते. फार सांभाळावे लागते. त्यावर हा उपाय. वरती टोपी अन त्यालाच जोडलेली शाल. पूर्वीची कापडी कुंचीच. जरा नव्या पद्धतीने Happy याला मी नाव दिलं "कॅपकेप"
डावी कडे गुंडाळल्या नंतर आणि उजवी कडे पूर्ण उघडल्यावर

IMG_5160 copy.jpg

आणि हे दोन फ्रॉक स्टाईल स्वेटर.

IMG_5156 copy copy.jpgIMG_5155 copy.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई शप्पथ!! कस्ले क्यूटी क्यूटी आहेत सगळे पॅटर्न्स!!...........फारच गोडू गोडू.....खूप आवडले. Happy

फ्रॉक्स मस्त आहेत एकदम. 'कॅपकेप'ला प्रेस बटन्स लावले तर आणखीनच पक्की राहाते शॉल.

धन्यवाद सर्वांना.
सिंडी, हो ग, गळ्याजवळ शो बटण आणि काज केलय. फोटोत आलं नाही बहुदा .
वाईज वुमेन थिंक अ लाईक ः)

खुप मस्त! रंग तर अगदी क्युट आहेत. पण पॅटर्न पहिल्याचे आणी तिसर्‍याचे खुप आवडले. कशा ग तुम्ही सर्व ईतके विणकाम करता? मला ते जमतच नाही. तु, डॅफोडिल्स, अनया, जयवी.. मस्त करता एकेक गोष्टी.

Pages