येईल चंद्र नक्की...

Submitted by सुशांत खुरसाले on 7 April, 2013 - 12:27

होतात का मनाला भलतेच भास हल्ली?
घडते मुळी न काही नुसता विलास हल्ली!

ना मागतो तरी मी येती वसंत दारी
भलतेच गंध त्यांचे छळती दिलास हल्ली!

उरलाय तोच बाणा ?उरलोय मी दिवाणा?
घेतो तपासुनी मी माझी मिजास हल्ली!

येईल चंद्र नक्की अभिजात ओढ आहे.....े
देतोय मी दिलाशे माझ्या नभास हल्ली!

उरली न काळजीही आता मरावयाची
मारावयास उठती माझेच श्वास हल्ली!

भलत्या कुणामधेमी गुंतू नये म्हणूनी
तुजला स्मरावयाचा करतो प्रयास हल्ली!

उत्थान आसवांचे अन् पतन साधनांचे
राणी तुझ्याचसाठी जातो लयास हल्ली!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीताई आणि वैवकुजी आभार!

श्वास इ.शेर थोडे जुन्या पद्धतीचे आहेत...असे मलाही वाटलेच ..असो.

शशांकजी, गझलप्रेमी, बेफिजी अनेक आभार!
@गझलप्रेमीजी, विपु म्हणजे काय?
तितकंसं माहीत नाही माबोवर अजून तसा नवखाच आहे मी....
गै.न.

उरली न काळजीही आता मरावयाची
मारावयास उठती माझेच श्वास हल्ली! >>> हा शेर सर्वात आवडला.

सुशंतजी,
विपु म्हणजे विचारपूस!
आपल्या नावावर क्लिक करा, म्हणजे आपले सदस्यत्वाचे पान उघडेल.
मग वरती विचारपूस असे दिसेल, त्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आम्ही लिहिलेला केवळ तुमच्यासाठीचा प्रतिसाद दिसेल.
आमच्या विपुमधे तसेच जा व तिथे आपली मते/प्रतिसाद लिहा म्हणजे तो तुमच्या गझलेच्या धाग्यावर न दिसता आपणास आपापल्या विपुत पहायला मिळेल!
दोन व्यक्तींच्यामधील संवाद हा अशा रीतीने साधता येतो इथे, म्हणजे इतरांना ते वाचण्याचा त्रास होत नाही!

दोन व्यक्तींच्यामधील संवाद हा अशा रीतीने साधता येतो इथे, म्हणजे इतरांना ते वाचण्याचा त्रास होत नाही!>>>>>>>>>>>
देर आये लेकिन दुरुस्त आये !!
अभिनंदन देवसर (गप्रेजी)

देर आये लेकिन दुरुस्त आये !!
अभिनंदन देवसर (गप्रेजी)

म्हणजे वैभ्या, तुला आमच्या प्रतिसादाचा त्रास होतो काय?
इतरांनाही(इच्छुकांना) उपयुक्त व्हावे यासाठी आम्ही त्या त्या धाग्यावर लिहायचो!
काय करणार, मास्तर आहोत! वर्गात, कितीही टारगट मुले असू देत, दोनचार गुणी व इच्छुक विद्यार्थ्यांसाठी आम्ही जीव तोडून शिकवतच रहातो, त्यांना खाजगीत भेटून काही सांगत बसत नाही! शहाणी मुले, घ्यायचे ते घेतात व फायदा करून घेतात!
त्याच न्यायाने आम्ही इथे प्रतिसाद देत आलो आहोत, पण आता तू केलेल्या आमच्या अभिनंदनावरून आम्ही आमची शैली आजपासून बदलत आहोत! धाग्यावर तुझ्यासारख्यांना संक्षिप्त व गोडव्यात्मकच प्रतिसाद द्यायचा, म्हणजे शायराच्या अहंकाराला धक्का लागणार नाही, शिवाय तुझ्यासारख्यांना वाचायची तसदीही घ्यायला लागणार नाही!
पण एक मात्र निश्चित की, आमचे म्हणणे त्या त्या शायरांच्या विपुत मात्र निश्चितच लिहिणार!
टीप: कार्यबाहुल्यामुळे सर्वच गझलांची अभ्यासपूर्ण दखल घेणे आम्हास जमत नाही, म्हणून ज्या गझलेत मुळात काही दम आहे असे प्रथमदर्शनी आम्हास जाणवते, त्याच गझलेवर, सखोल चिंतन करून आम्ही प्रतिसाद देत असतो, ज्याचा फायदा इतरांना किती होतो, माहीत नाही, पण आमच्या साहित्यिक पोषणासाठी त्याचा
उपयोग निश्चितच होतो, हा आमचा आजवरचा ६-७महिन्यातील अनुभव आहे!
अशा अभ्यासाचा उपयोग आमच्या गझललेखनात होत असल्याचाही अनुभव आम्ही घेत आहोत!
तेव्हा, वैभ्या खुश ना आता?
समस्त मायबोलीकरांचा हितचिंतक,
.............गझलप्रेमी

प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत वेगळी असते
तुमची पद्धत ही आहे हे मी ओळखले होते केंव्हाच पण त्यापोटी तुम्ही इतरांचा सौंदर्यबोध काव्यजाणीव गझलगांभीर्य लेखनगर्भनिष्ठा चिंतनशैली इत्यादीइत्यादीवर जे शिंतोडे उडवायचात त्यावर आमचा सर्वांचा आक्षेप असे

असो

वैभवा!
प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत वेगळी असते
तुमची पद्धत ही आहे हे मी ओळखले होते केंव्हाच पण त्यापोटी तुम्ही इतरांचा सौंदर्यबोध काव्यजाणीव गझलगांभीर्य लेखनगर्भनिष्ठा चिंतनशैली इत्यादीइत्यादीवर जे शिंतोडे उडवायचात त्यावर आमचा सर्वांचा आक्षेप असे<<<<<<

काय हवे होते हे आपल्या शब्दात व शैलीत सांगणे याने इतरांच्या सौंदर्यबोधावर, काव्यजाणीवांवर, गझलगांभिर्यावर, लेखनगर्भनिष्ठेवर(असल्यास) शिंतोडे कसे उडतात हे केवळ अनाकलनीय आहे! असो. ज्याच्या त्याच्या नजरेचा प्रश्न आहे तो!

तुझे म्हणणे घडीभर मानून चालू यात, मग येथील (मायबोलीवरील)अनेक सुमार गझलांमुळे, त्यावर येणा-या अनाकलनीय गोडव्यात्मक प्रतिसादांमुळे कुणाचा/वाचकांचा/गझलकारांचा सौंदर्यबोध, गझलगांभिर्य, असलेल्या/नसलेल्या लेखननिष्ठेवर कसे काय शिंतोडे उडत नाहीत व त्या त्या गोष्टी मलीन कशा होत नाहीत?
टीप: पळकुटे उत्तर देऊ नये
समस्त मायबोलीकरांचा हितचिंतक,
........गझलप्रेमी

काय हवे होते हे आपल्या शब्दात व शैलीत सांगणे>>>>>>>

कोणाला हवे असते ते कोण ठरवते ?
हेच हवे होते तेही कोण ठरवते ?
का हवे आहे हेतरी कोण ठरवते ?

सगळे तुमचेच मनाचे खेळ असतात जे आम्ही गोड मानावेतच असा आग्रहही असतो वरून!!

वैभवा!
प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत वेगळी असते
तुमची पद्धत ही आहे हे मी ओळखले होते केंव्हाच पण त्यापोटी तुम्ही इतरांचा सौंदर्यबोध काव्यजाणीव गझलगांभीर्य लेखनगर्भनिष्ठा चिंतनशैली इत्यादीइत्यादीवर जे शिंतोडे उडवायचात त्यावर आमचा सर्वांचा आक्षेप असे<<<<<<

तुझ्या मनाचेच खेळ सारे....
तसे कुणाच्या मनात नाही!

समस्तमायबोलीकरांचा हितचिंतक,
............गझलप्रेमी

शिवरामजी,
मस्त आहे...
मस्त 'परीसंवाद' रंगलाय...

आमच्यासारख्या नवशिक्यांना बरंच शिकायला मिळेल. ..!<<<<<<<<<<<

हा प्रेमालाप आहे नवशिक्यांनाच का, जूनशिक्यांना देखिल बरेच काही शिकता यावे यातून!
टीप: आम्ही देखिल गझलक्षेत्रात तरी अजून नवशिके उमेदवार आहोत व शिकण्यासाठी धडपडत आहोत!

उकाका,शिवमजी,गझलप्रेमी मंडळी,वैवकु सर्वांचे आभार!
भलतीच भरभरून मते व्यक्त होतायत....गझलप्रेमींना आम्ही 'विपू 'मध्ये काय तो संदेश पाठवला आहेच..