वाटा जुन्या अताशा

Submitted by विस्मया on 5 April, 2013 - 04:38

वाटा नव्या निघाव्या, रस्त्यात चालताना
वाटा जुन्या अताशा, झाल्यात चालताना

इच्छा न राहण्याची, शहरात या तुझ्या रे
दमले इथे, चमकत्या, ता-यांत चालताना

टाळून चालले मी, या आरशास येथे
टाळू कशी कुणाला, गावात चालताना

वाहून आज आले, चिंता पुन्हा पुन्हांदा
स्मरले कधी तुला ना, रानात चालताना

सांगू कशी समोरी, त्या वादळास गेले
निर्धार फक्त होता, भानात चालताना

ती आग भोगली मी, मन बेचिराख झाले
भय वाटते तुला या, ज्वाळांत चालताना

- मै..
४.४.१३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

छान

विस्मया !

छान आहे तुमची किमया !
कविता खरंच फार छान आहे.

बाकि . . . . ता-यात साठी तुम्ही आधी "ता", नंतर कॅप लॉक करा > र टंका > कॅप अन्-लॉक करुन य टंका > आणी दोनदा अ टंका. म्हणजे तो तार्‍यात होईल.

हा ज्ञान पाजळण्याचा माझा आगाऊपणा झाला असेल तर क्षमा करावी.

काही बोलायला जावं आणी ४-५ जणांनी धरुन जोडे मारावे असं झालंय एकदा . . . .

इच्छा न राहण्याची, शहरात या तुझ्या रे
दमले इथे, चमकत्या, ता-यांत चालताना
.
टाळून चालले मी, या आरशास येथे
टाळू कशी कुणाला, गावात चालताना
.
ती आग भोगली मी, मन बेचिराख झाले
भय वाटते तुला या, ज्वाळांत चालताना

बढिया. मस्त. आवडलेत. Happy

>>इच्छा न राहण्याची, शहरात या तुझ्या रे
दमले इथे, चमकत्या, ता-यांत चालताना
-----
सांगू कशी समोरी, त्या वादळास गेले
निर्धार फक्त होता, भानात चालताना >>
व्वाह! क्या बात! मस्त