अंधारून आलंय...

Submitted by रोहितगद्रे१ on 5 April, 2013 - 00:35

अंधारून आलंय...
मिटून डोळे घेतलेत मी
जरी काळोख मिट्ट आहे
काहीच दिसणार नाही उघड्या डोळ्यांनी
म्हणून मिटलेत
आंधळेपणाचा भास होईल त्या भीतीने मिटलेत
अंधार गडद आहे , रात अमावस आहे
तरी काजव्यांना कोणाचं भय आहे?
प्रकाश आहे मंद ,पण माझा झरोका बंद
रात अखंड आहे दाट माझ्यात..
काळोखाने दिपवून टाकलंय मला
आता उजाडायची वाट पहातोय..
पण मिटलोय एवढा गच्च की
उजाडलेलं तरी दिसणारंय कसं
प्रकाश पहायचा असेल तर
मला काळोखातच उघडावे लागणारेत डोळे
आतला दिवा पेटवून बाहेरच्या उजाडण्याच्या स्वागतासाठी...

Group content visibility: 
Public - accessible to all site users