जसा होतो तसा आहे

Submitted by मयुरेश साने on 2 April, 2013 - 03:48

जसा होतो तसा आहे
अजुनही मी तुझा आहे

तुला अंदाजही नाही
मला तर भरवसा आहे

जरी बेरीज तू माझी
तुझ्यातुन मी वजा आहे

मला समजू नको बंदी
तुझा मी आसरा आहे

भराव्या रोज तू जखमा
अशी दे ! जर सजा आहे

कसे बिलगू तुला मी ? तू
उन्हाचा कवडसा आहे

सुने अस्तीत्व हे माझे
हरवलेला ठसा आहे

मयुरेश साने....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जसा होतो तसा आहे
अजुनही मी तुझा आहे

तुला अंदाजही नाही
मला तर भरवसा आहे

मला समजू नको बंदी
तुझा मी आसरा आहे

व्वा. शेर आवडले.

जसा होतो तसा आहे
अजुनही मी तुझा आहे

तुला अंदाजही नाही
मला तर भरवसा आहे

हे दोन चांगले आहेत.

>>(अव्यक्त 'स' का?) .. नाही कळला प्रष्ण<<
गझललेखनात काही काही पायऱ्या आहेत.
१. एखादे अक्षर अव्यक्त ठेवणे
२. एखादा शब्द अव्यक्त ठेवणे
३. शेरातून काय सांगायचय तेच अव्यक्त ठेवणे

तिलकधारी आला आहे.

सुने अस्तीत्व हे माझे
हरवलेला ठसा आहे<<<

या शेराने तिलकधारीला गुंगवले, विचारात पाडले.

गझल वाचताना हा अव्यक्त स फार त्रासदायक चीज होतो माझ्यासाठीतरी
त्याव्यतिरिक्त पाहता सर्वच शेर खूप आवडले

मयुरेशजींची गझल अनेक दिवसांनी वाचायला मिळाल्याचा आनंदही होत आहेच Happy

मयुरेश छान आहेत तुझे खयाल!
-हस्वदीर्घ काही ठिकाणी खटकले!
तुझे काही शेर असे वाचले......

जसा होतो तसा आहे!
तुझा होतो, तुझा आहे!!

जरी बेरीज तू माझी,
खरे तर मी वजा आहे!

कुठे बंदिस्त मी आहे?
तुझा मी आसरा आहे!

भराव्या रोज तू जखमा;
हवीशी ही सजा आहे!

कसे मी सांग बिलगावे?
तुझा हा कवडसा आहे!

सुने अस्तित्व हे माझे....
जसा धूसर ठसा आहे!

............इति गझलप्रेमी

पर्यायी कशी ते नंतर पाहू ................

पण गरज होती असे वाटले मलाही
गरज न सांगताच पूर्ण केल्याबद्दल देवसरांचे व्यक्तिगत आभार Happy

कसे मी सांग बिलगावे?
तुझा हा कवडसा आहे!

सुने अस्तित्व हे माझे....
जसा धूसर ठसा आहे!<<< मस्त

पण स्वतंत्र गझल म्हणून छापावी.

तुझे काही शेर असे वाचले......

<<<

त्याचे तसे शेर तू असे कसे वाचलेस रे गझलप्रेमी?

घा गझली प्रतिभेचा विनयभंग आहे

तिलकधारी तुला वॉर्न करत आहे.

तिसरी चूक - अक्षम्य चूक

तिलकधारी हळहळः व्यक्त करून निघत आहे.

Lol
___________________________
पर्यायी शंका :
बंदिस्त व आसरा यातील लिंक समजली नाही
धूसर ठसा ला सुने अस्तित्त्व हे ही फरसे एकजीव नाही वाटले सुने ऐवजी अधिक योग्य विशेषण हवे असे वाटले