राखाडी

Submitted by कौतुक शिरोडकर on 2 April, 2013 - 03:19

मी ...
कुणासाठी काळा,
कुणासाठी पांढरा.
पण खरा मी..
राखाडी.
नेहमीच.
पण दुर्लक्षित.
..
.
मला
काळ्या किंवा पांढर्‍याच्या
यादीत टाकण्याआधी
एक लक्षात घ्या...
...
..
उत्तर आणि दक्षिण
या दोन टोकांच्या
मधेच खरं जग असतं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त! आयुष्याचं सार इतक्या कमी शब्दात सांगणं तु आणि तुच करू जाणे.
नाहीतर लोकांना फक्त २ च रंग कळतात. एक काळा आणि एक पांढरा.. हे किंवा ते मध्ये नाहिच काही. कुणितरी मला सांगितलं होतं की टोक गाठणं फार सोप्पं असतं. किंवा कोणत्यातरी एका काठावर असणं... कारण प्रवाहात पोहणं सर्वांनाच जमतं असं नाही.

कविता खूप आवडली, त्याहीपेक्षा त्यातला संदेश आवडला.. Happy

पुलेशु!

उत्तर आणि दक्षिण
या दोन टोकांच्या
मधेच खरं जग असतं.............. क्या खूब कही .. !!

khup chan