...येणे झाले!

Submitted by मुग्धमानसी on 2 April, 2013 - 01:47

कधी अलवार पायांनी असे स्वप्नात येणे झाले
कधी बिजलीप्रमाणे तळपुनी निमिषात येणे झाले
जशी यावी फिरूनी ओठी नवथर ओळ गाण्याची
तसे माझे कितीदा फिरूनी या जगण्यात येणे झाले!

प्रवासी मीच होते, वाट मी अन् मीच मंझिल
सभोती किर्र तम मी, मीच हातातील कंदिल
तरिही या ’मी’पणाला वेचताना सांडलेल्या
क्षणांचे नकळता डोळ्यांतल्या पाण्यात येणे झाले!

दुरूनी ते शब्द आले भेटण्या... नवखेच होते
जरी मी आपले म्हटले तरी परकेच होते
सूरांना धाडले बोलावणे, डिवचले वेदनेला...
जरा तेंव्हा कुठे त्यांचे असे गाण्यात येणे झाले!

अताशा मी मलाही सोडलेले या प्रवाही
प्रवाहाला तसाही कोणता आकार नाही
अशी मी वाहताना आणि निराकार होताना
कसे माझे पुन्हा रे या तुझ्या असण्यात येणे झाले?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रवासी मीच होते, वाट मी अन् मीच मंझिल
सभोती किर्र तम मी, मीच हातातील कंदिल
तरिही या ’मी’पणाला वेचताना सांडलेल्या
क्षणांचे नकळता डोळ्यांतल्या पाण्यात येणे झाले!

अताशा मी मलाही सोडलेले या प्रवाही
प्रवाहाला तसाही कोणता आकार नाही
अशी मी वाहताना आणि निराकार होताना
कसे माझे पुन्हा रे या तुझ्या असण्यात येणे झाले?

>> बेहतरीन!!!

सूरांना धाडले बोलावणे, डिवचले वेदनेला...
जरा तेंव्हा कुठे त्यांचे असे गाण्यात येणे झाले!............अहाहा....मस्त मस्त Happy

*

प्रवासी मीच होते, वाट मी अन् मीच मंझिल
सभोती किर्र तम मी, मीच हातातील कंदिल
तरिही या ’मी’पणाला वेचताना सांडलेल्या
क्षणांचे नकळता डोळ्यांतल्या पाण्यात येणे झाले!

अताशा मी मलाही सोडलेले या प्रवाही
प्रवाहाला तसाही कोणता आकार नाही
अशी मी वाहताना आणि निराकार होताना
कसे माझे पुन्हा रे या तुझ्या असण्यात येणे झाले?<<< उत्कृष्ट

धन्यवाद

मस्त अतीशय आवडली

नेहमीप्रमाणे तुमच्या कवितेत आजही गझल दिसली
अनेक मिसरे बेहद आवडले

अधिकाधिक तरल लिहू लागलात तुम्ही आजकाल अतीशय सहजसोप्या ओळी आर्त आशय विशय तत्क्षणी मनाचा ठाव घेतात

प्रवासी मीच होते, वाट मी अन् मीच मंझिल
सभोती किर्र तम मी, मीच हातातील कंदिल>>>>>>>>>>>>शेर म्हणून फार छानाहेत या ओळी

अताशा मी मलाही सोडलेले या प्रवाही
प्रवाहाला तसाही कोणता आकार नाही>>>>>>>>>>>>>>>>याही !!