तुझ्यासह.. तुझ्याविना ...

Submitted by विदेश on 29 March, 2013 - 09:27

तू असताना चंद्रचांदणे
तू नसताना खिन्न स्फुंदणे

तू असताना श्वास हवेसे
तू नसताना फक्त उसासे

तू असताना मधुर कहाणी
तू नसताना फक्त विराणी

तू असताना मंगल प्रभात
तू नसताना काजळ रात

तू असताना सुरेल सनई
तू नसताना फक्त जांभई

तू असताना जग हे हसते
तू नसताना सगळे फसते !
.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ..... विरोधाभास छान मांडलाय.
-------------------------------------------------------------------------
अवांतर : मला माझ्या अपूर्ण कवितेची आठवण झाली.
"तू असताना सवे, काळ हा वायूवेगे जाइ पुढे
तू नसताना का मग त्याला कूर्मगतीचा रोग जडे"
पूर्ण करायचा मूड्/योग कधी येणारे देव जाणे Proud

विदेश जी
विरोधाभास उत्तम जमलाय व तुलना ही साधी पण छान
हे मात्र
>>तू असताना सुरेल सनई
तू नसताना फक्त जांभई >>
ऐवजी
>>तू असताना सुरेल सनई
तू नसताना फक्त आरोही अन अवरोही>>
कसे वाटतेल?