गवसलेच नाही!

Submitted by आर.ए.के. on 28 March, 2013 - 08:05

कधी मी स्वतःला हुडकलेच नाही,
हरवले अशी की पुन्हा गवसलेच नाही!
मिळाला ना कधी पाकळ्यांना कवडसा,
कोमेजले अशी कि, उमललेच नाही!
बरसला तो श्रावण, मी मात्र कोरडी,
नयनांतून अश्रु , बरसलेच नाही!
निष्पर्ण झाली ती रोपटी स्वप्नांची,
श्रावणात कोणत्या मी बहरलेच नाही!
गर्तेत दु:खाच्या कोसळले अशी मी,
बुडले अशी मी, कधी तरलेच नाही!
कधी कातरवेळी, आठवते मलाही,
टोचणी दु:खाची, कधी विसरलेच नाही!
दु:खाशी माझे कधी बिनसलेच नाही,
ढिगार्‍यात दु:खाच्या अन सुख सापडलेच नाही!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@UlhasBhide प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
लिहिताना वृत्ताकडे लक्ष गेलचं नव्हतं. यापुढे देईन.