रेषा

Submitted by kaushiknagarkar on 26 March, 2013 - 15:03

रेषा

रेषा कपाळावर कोंदटलेल्या
तळहातावर सुरकुतलेल्या
रेषा चेहेऱ्यावर रापलेल्या
रेषा आयुष्य जगलेल्या

रेषा खळखळून हसणाऱ्या
मिश्कील डोळ्यात नाचणाऱ्या
रेषा थरथर कापणाऱ्या
अोठ मुरडून रुसणाऱ्या

रेषा कठोर अभिमानी
रेषा दीन बेईमानी
रेषा जाड नि बारीक
उभ्या आडव्या कारस्थानी

रेषा सरळ समांतर
क्षितिजात जाऊनही न मिळणारी
रेषा वळणावळणाची
स्वत:तच गुरफटणारी

रेषा नरम मुलायम मखमली
जाड्याभरड्या भसाड्या मवाली
रेषा पाण्यावर भिजलेल्या
क्षणार्धात विझलेल्या

रेषा छेदणाऱ्या भेदणाऱ्या
तोडणाऱ्या जोडणाऱ्या
असून नसणाऱ्या
अनादी अनंत. रेषा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users