और जाहले नाते आज बापलेकांचे!

Submitted by गझलप्रेमी on 26 March, 2013 - 11:11

मुसलसल गझल

और जाहले नाते आज बापलेकांचे!
पोरगे पहा पाढे वाचतात बापांचे!!

पोर बोलते भाषा कालचीच बापाची.....
बाप झेलतो आहे बाण त्याच शब्दांचे!

केवढा लळा होता काल याच बापाचा....
भेटणे किती दुर्मिळ आज बापलेकांचे!

पाहुण्यापरी येती पोरगे घरी आता.....
आजही घरी घुमती बोल बोबडे त्यांचे!

मूर्तिमंत बापाची पोर एक आवृत्ती!
सारखे किती आहे ते उधाण दोघांचे!!

झाड आजही आहे त्याच कालच्या जागी!
दूर पाखरे गेली, भास राहिले त्यांचे!!

वेगळे जरी घरटे आज बापलेकांचे!
एकसारखे स्पंदन आज एकमेकांचे!

............गझलप्रेमी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीकर रसिकमायबापांनो...........

काय?........ आपणही हा अनुभव घेत आहात काय?

एक कुतुहल म्हणून विचारले!

,,,,,,,,,,गझलप्रेमी

भूषणराव,तिलकधारीजी, गंभीर समीक्षक, विजयराव व कैलासराव, काय वाटते आपणास या गझलेबद्दल?
कृपया मार्गदर्शन करावे!

मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत,
............गझलप्रेमी

गझलप्रेमींची फारच खिल्ली उडवणार असशील तर नको रे बाबा ! कारण संताप आला की, तो आवरणे गझलप्रेमींना जरा अवघड जाते रे बाबा! मूड खराब होणार असेल तर नको रे बाबा ! आधीच २वेळा हुतात्मा झालो आहोत मायबोलीवर आम्ही!

होय गझलप्रेमी!

हा माझा एक शेर आठवला.

स्वतंत्र झाले अता घरोबे, मधेमधे भेटण्यास येती
बसायची भूर जायला जी कडेवरी गुटगुटीत दु:खे

भूषणराव, पहिली ओळ स्वतंत्र झालेल्या घरोब्यांना उद्देशून आहे व दुसरी ओळ सुंदरच आहे जी गुटगुटीत दु:खांना उद्देशून आहे! दोन मिस्यातील सोयरीक घट्ट नाही का करता येणार?

काही शेर नवख्या गझलेच्छूने लिहावे असे झाले आहेत.

म्हणजे काही शेर फारच होतकरू वा नादार आहेत असे का?

टीप: सदर गझल आशय सांगून त्यावर आमच्याकडून १दिवसात लिहून घेतली गेली आहे!
बाकीचा खुलासा नंतर काही दिवसांनी करेन! तूर्तास नाही! काही मर्यांदांची बंधने सध्या असल्याने!

भूषणराव हा पर्याय नव्हे, केवळ निखळ आस्वादक चर्चा म्हणून पहावे.............

अता न येती अंगचटीला, या म्हाता-या कृश देहाच्या.......
बसायची भूर जायला जी कडेवरी गुटगुटीत दु:खे!

प्रोफेसर तुमच्या पहिल्या मिसर्‍यात आव आहे आणि भूषणरावांच्या साधेपणा. आपण आणलेली तीव्रतासुद्धा काही लोकांचे मनोगत असू शकेल पण हताश झालेला बाप भूषणरावांच्या पहिल्या मिसर्‍यासारखा बोलेल कदाचित!

संपूर्णपणे वैयक्तिक मत, राग नसावा!

विजयराव दोन्ही शेरांचा पोतच वेगळा आहे!
भूषणरावांच्या शेरातील दोन मिस-यांमधील दुरावलेल्या नात्यावर आम्ही बोट ठेवले होते, जे नाते घट्ट करायला पहिला मिसरा असा लिहून पाहिला! या दोन ओळीतील नात्यांबाबत आम्ही जे वर वदलो त्यावर काही बोला की, राव!

अवांतर: सदर गझलेतील आमच्या शेरातील होतकरूपणावर काही बोलाल काय?

भूषणरावांच्या शेरात दोन मिसर्‍यांत क्षीण संबंध आहे असे मला वाटत नाही.

ह्या गझलेतील शेरांवर प्रत्यक्ष भेटीत बोलू पुण्यात.

भूषणराव.
अता न येती अंगचटीला, या म्हाता-या कृश देहाच्या.......
बसायची भूर जायला जी कडेवरी गुटगुटीत दु:खे!

अता न येती अंगचटीला, या म्हाता-या कृश देहाच्या.......<<< हिरण्यकेशी भंगले

बरोबर हेरलेत भूषणराव! धांदलीत वृत्तदोष लक्षात नाही आला! क्षमस्व! अता शेर असा करता येईल....

अता न येती अंगचटीला, या थरथरत्या क्षीण तनूच्या.......
बसायची भूर जायला जी कडेवरी गुटगुटीत दु:खे!

आता दोन्ही मिसरे जवळ आले का भूषणराव? तुमच्या मनातील अर्थ बदलतो का असे केल्याने?
कृपया आपला मूळ शेर समजावून सांगाल का?
.............गझलप्रेमी

बेफीजींचा मूळ शेर कळतो
देवसरांचाही कळतो

बेफीजींचा पहिला मिसरा दुसर्‍याला जास्त एकरूप वाटत नाही हे मान्य पण देवसरांचे पर्यायीही नाहीत उतरत त्या कसोटीस

शेराचा तुला समजलेला अर्थ गद्यात वदशील काय वैवकु? म्हणजे तुझ्या कसोट्यांचा अंदाज येईल थोडासा!

सहजता सापडली नाही.<<<<<<<<<<<<<<,

कुठे हरवली आहे का? शोधा म्हणजे सापडेल!

Sad
स्वतःच हजार प्रश्न विचारून प्रतिसाद संख्या वाढवताय Sad
सगळ्या यांच्याच गझला पहिल्या पानावर!
दुसर्‍यांचं लिखाण शोधत बसावं लागतय Angry

विपूत विचारा ना त्यांना विजयराव याबद्दल काय वाटलं, भुषणराव ते विचार पटले का.... Angry

धन्यवाद आनंदयात्रीजी, आपल्या प्रांजळ व परखड मताबद्दल!
कुठे हरवली आहे का? शोधा म्हणजे सापडेल!

हे दोन परस्पर विरोधी प्रतिसाद एका प्रतिसादात नाही का देता येत?
का सुचतं तसे सुचतील तितके प्रतिसाद देत बसायच? Angry
गझला सोडून इतर काही वाचता का हो तुम्ही?

आणि त्या भूषणरावांचा शेर बर्‍यापैकी चांगला आहे... त्याला पर्यायाची काही गरज आहे का?
ते पण थरथरती तनू वगैरे?

>> बरोबर हेरलेत भूषणराव! धांदलीत वृत्तदोष लक्षात नाही आला! क्षमस्व! अता शेर असा करता येईल....
अता न येती अंगचटीला, या थरथरत्या क्षीण तनूच्या
<<
Uhoh

बाई Proud

Pages