गझल

Submitted by शुभानन चिंचकर 'अरुण' on 26 March, 2013 - 09:16

पुस्तकातुन फक्त आम्ही वाचली एकात्मता
पाहिली चोहीकडे जातीयता धर्मांधता

एवढे देशात माझ्या फक्त बाकी राहिले
भ्रष्ट वागायास द्यावी कायद्याने मान्यता

एकटा जो त्यास खोटे पाडले जाते इथे
मूर्ख गर्दीचीच येथे मान्य होते सत्यता

व्यक्त होता लादती ते देशद्रोहाचा गुन्हा
लाभते देशात आम्हा एवढी स्वायत्तता

'अरुण' येथे एवढी आहे महागाई कुठे ?
फुकट घेतो श्वास अजुनी, तीच मानू धन्यता !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्यक्त होता लादती ते देशद्रोहाचा गुन्हा
लाभते देशात आम्हा एवढी स्वायत्तता<<< उपरोध आवडला Happy

एवढे देशात माझ्या फक्त बाकी राहिले
भ्रष्ट वागायास द्यावी कायद्याने मान्यता

लोकपालच्या पार्श्वभूमीवर .... Happy