हिरवा

Submitted by विस्मया on 25 March, 2013 - 14:37

रात्री डोळ्यात बोट घातलं तरी
दिसणार नाही असा अंधार
आणि दिवसा स्वप्नं जाळणारी
रणरणती निर्दयी दुपार
कसाही फिरला कुंचला तरी
संपावर गेलेला हिरवा रंग
परतून येत नाही
अशातच
पुन्हा कपाट उघडलं तेव्हां
उरलेलं शेवटचं दु:खं म्हणालं
उद्या मिटेल बरं संप..
मग रंगव पूर्ण कॅनव्हास !!!

तेव्हांपासून
त्या जाणिवेने
त्या कल्पनेनेच
सर्वत्र रंग भरतेय..
हिरवा, फक्त हिरवा
आणि दु:खं हसत म्हणतं
"उद्या" तरी येऊ देशील ?

मैत्रेयी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख !!