विषय संपवून टाकू!

Submitted by आर.ए.के. on 22 March, 2013 - 00:58

चल आज हा विषय संपवून टाकू,
जे काही खदखदतयं मनांत,
आज ते सगळं बोलून टाकू!

कबूल करु ते सगळं,
जे काही हातून चुकलं,
चुकलेलं गणित आज पुन्हा सोडवून टाकू!

प्रयत्न करुया संपवण्याचा,
वाढत चाललेलं अंतर,
दूर होणार्‍या वाटांना आज जुळवून टाकू!

तुझं दुर्लक्ष, माझा अबोला,
अन मनाला झालेली ज़खम,
मतभेदांचे हे ओरखडे, आज पुसून टाकू!

काय म्हणतोस...? चल ना..
झालेला कलह, वाद,
आणि तो असह्य दुरावा, आज मिटवून टाकू!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

@मंदार खरे << तुमची कविता वाचली नव्हती. धन्यवाद.
आनंदयात्री प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.